Marathi

नाना पाटेकरांना झाले होते आपल्यापेक्षा 21 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर प्रेम ! लिव्ह-इन मध्ये राहत होते !

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमसंमंध जुडात असतात तसेच अनेक तुटतही असतात. असे म्हणतात कि बॉलीवूड इंडस्ट्री हि मोहमायाने भरलेली आहे. इथे खूप सारे कलाकार आहेत ज्यांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिलेली आहे. त्यामध्येच नाना पाटेकर यांचं नाव सुद्धा जोडल गेलेलं आहे. नाना पाटेकर यांची कहाणीसुद्धा अशीच अपुर्ण राहिलेली आहे.

नाना पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील जंजिरा येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले. त्यांनी खूप साऱ्या चित्रपटांत अभिनेता, लेखक व निर्माता म्हणूनही काम केलेले आहे. नाना पाटेकर यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. नाना पाटेकर हे त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या प्रेमप्रकरणांमुळेही चर्चेत राहिलेले आहेत.

नाना पाटेकर याना त्यांच्या चित्रपटातील अभिनेत्रीवर प्रेम झाले होते. त्या अभिनेत्रींचे नाव होते मनीषा कोइराला! नाना स्वतःला मनीषाच्या आकर्षणापासून वाचवू शकले आणि आणि त्या दोघांमध्ये प्रेमसंमंध सुरु झाले. दोघांच्या वयामध्ये जवळपास २०-२१ वर्षांचा फरक होता. त्यावेळेस नानांचे लग्नही झालेले होते. बॉलीवूडमध्ये सर्वांसाठी हि बातमी धक्कादायक होती, कारण नाना सारखी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडेल हे कुणालाही वाटत नव्हते. मनीषाचेही नानांवर खूप प्रेम होते.

असे म्हणतात कि त्या वेळेस नानांचे त्यांच्या पत्नीसोबत काही वाद सुरु होते. म्हणून ते आपल्या पत्नीसोबत राहत नव्हते. नाना पाटेकर मनीषा बरोबर लिव्ह इन मध्ये राहत असल्याचे पण सांगितले जात होते. नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि त्यांची मनिषाबरोबर ओळख खामोशी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस झाली. त्यानंतर ते एकमेकांना चांगले समजायला लागले आणि त्यांचे नटे आणखी घट्ट होत गेले. त्या चित्रपटात नानांनी मनीषाच्या वडिलांचे पात्र साकारले होते.

नानांचे इतर अभिनेत्रींना भेटणे हे मनीषाला अजिबात आवडत नव्हते. नानांही मनिषाने सेटवर छोटे छोटे कपडे घातलेले आवडत नसायचे. ते याबाबत मनीषाला नेहमी बोलत असत. याच गोष्टीवरून युगपुरुष चित्रपटाच्या शुटिंगवेळी नानाचे मनिषाबरोबर कडाक्याचे भांडण झाले होते.

मनीषा कायम नानांना लग्नाबद्दल विचारात असे. नानांनाही मनिषाबरोबर लग्न करायचे होते. मनीषा नानांना त्यांचा पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायला सांगत होती, पण नाना असे करायला मुळीच तयार नव्हते. नंतर मनिषाने हळूहळू नानांसोबत दुरावा करण्यास सुरुवात केली आणि आपले नाते तोडले.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker