Health

महिलांनो वयाच्या ४० वर्षांनंतरही फिट राहायचं तर करा या सोप्या पद्धतीचा वापर !

स्त्रियांच्या आयुष्यातील बराचसा काळ हा प्रजननाशी निगडित असतो. मासिकपाळी सुरू झाल्यापासून ते मासिकपाळी बंद होईपर्यंत (म्हणजेच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीपर्यंत) हा साधारण ३० वर्षांचा काळ असतो. ह्या 30 वर्षांत त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. साधारण चाळिशीमध्ये स्त्रियांचा रजोनिवृत्तीचा काळ जवळ येतो. त्यामुळे हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांना विविध शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. या कालावधीत शरीराची चयापचयाची गती मंद झालेली असते. त्यामुळे शरीरावर मेद जमा होवू लागते व शरीर बेढब व बेडौल दिसायला लागते. त्यामुळेच हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, ॲनेमिया, संधीवात यासारखे विकार आपले डोके वर काढावयास लागतात. परंतु ह्यावर उपाय करण्यासाठी फार पैसे गरज करण्याची गरज नाही. तुम्ही मुळातच किचन क्वीन असता त्यामुळे तुमच्या ह्या हक्काच्या किचनमधील गोष्टीच तुमचे आरोग्य तुमच्या चाळिशीनंतर देखील निरोगी ठेवण्यास मदत करतील. चला तर पाहूया चाळिशीतील स्त्रियांचे आजार आणि आहार.

रक्तदाब व हृदयविकार – भारतीय स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण २० – २५ टक्क्यांनी वाढत आहे. याचा प्रतिबंध म्हणून जीवनशैलीत बदल, रक्तदाबाचे नियंत्रण, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी व रक्त पातळ ठेवण्यासाठी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.

मधुमेह – सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण असण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण साधारण १२ टक्के आहे.

हापोथायरॉईडिझम – ६५ वर्षांनंतर १५ टक्के प्रमाणात आढळतो.

रजोनिवृत्तीपूर्वी होणारा रक्तस्त्राव – अनियमित मासिक– पाळीत अति रक्तस्त्राव होणे, ही खूप सामान्य समस्या आहे. त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात जसे की गर्भाशयात फायब्रॉईडच्या गाठी किंवा हॉर्मोन्सचे असंतुलन आणि गर्भाशयातील आतील आवरणाला सूज येणे. पण गर्भाशयाचा कॅन्सर हेही ह्यामागचे कारण असू शकते, त्यामुळे वेळीच तपासणी करणे गरजेचे असते. बऱ्याच बायका ह्या आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि वेळेवर उपचार करत नाहीत, त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होतो.

रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव – म्हणजे मेनोपॉझनंतर परत रक्तस्त्राव होणे १० – १५ टक्के स्त्रियांमध्ये दिसून येतो. जरी हा स्त्राव खूप कमी प्रमाणात असेल तरी डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. ह्यामागे गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता असते.

हाडे ठिसूळ होणे (ऑस्टोपोरोसिस) – स्त्रियांमध्ये मासिकपाळी बंद झाल्यानंतर पहिली ५ – ७ वर्षे हाडांची झीज २ – ५ टक्के प्रतिवर्षी अशा दराने होत असते.

आहार दैनंदिन आहार हा समतोल आहार असावा म्हणजे विविध प्रकारचे तृणधान्ये, कडधान्ये व डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मटन, मासे, कमी प्रमाणात साखर, तेल व तेलबिया या सर्व अन्न पदार्थाचा वापर करुन आहार तयार करावा. यातून शरीराला लागणारी संपूर्ण पोषक घटक, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, कॅलरीज, जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ मिळतात.

चाळीशीनंतर आहारात कॅल्शियम, लोह, प्रथिने, फॉलिक ॲसीडची गरज वाढलेली असते. कॅल्शिअमच्या अभावाने हाडे खडूसारखी ठिसूळ होतात ज्यातून ओस्टोपोरोसिस सारख्या समस्या निर्माण होतंय. त्यामुळे आहारात दूध, दही, दुधाचे पदार्थ, पनीर, हिरव्या भाज्या, नाचणी, सुकामेवा, अंडी, खसखस, तीळ, राजमा, राजगिरा, पुदिना, कडीपत्ता, बदाम, सोयाबीन, गाजर, शेवग्याची पाने यासारख्या पदार्थाचे सेवन करावे. कॅल्शिअमच्या शोषणासाठी जीवनसत्व ‘डी’ची गरज असते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे, अंडी, मासे, दुधाचे पदार्थ खावे. यामुळे संधीवातापासून बचाव होतो.

-भक्ती संदिप (Nutritionist in Foodvibes Grocers)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker