Marathi

400 वर्ष जुन्या या मंदिरातून येतात वेगवेगळे आवाज पहा काय आहे सत्य ?

आपण आजवर बिहारला बऱ्याच नाही म्हणता बऱ्या-वाईट गोष्टींनी प्रसिद्ध मानून त्याची छबी डोळ्यांसमोर ऊभी करतो. पण आज मात्र इथल्या एका जगावेगळ्या चमत्काराचीच बाब मी तुम्हाला सांगणार आहे. राजराजेश्वरी त्रिपुरासुंदरी मंदिर हे बिहार येथे स्थित असलेलं देवीच मंदीर आहे. या देवीला दहा महाविद्यांपैकी एक प्रचलित महाविद्येच रूप म्हणून ओळखल जातं. पण मूळात तुम्ही आजवर कधी असं ऐकलत का की, एखाद्या ठिकाणी मंदिरातल्या मूर्त्या आपापसात बोलल्या.

होय! जे वाचताय ते नवलच आहे. मुळात संदर्भ देऊन सांगायचंच झाल तर या मंदिराच्या गाभाऱ्यातील रचना ही भारतातल्या इतर सर्व कोरीव शिलालेख वगैरेंसारख्या मंदिरांपेक्षा फारच वेगळी आहे. आजवर शास्त्रज्ञांना या रहस्याचा ऊलगडा करताच आला नाही की, रात्रीच्या अंधारात नेमका मंदिराच्या आतून कुजबुज चाललेला आवाज कुठून व कशा प्रकारे येतो. नानाविध प्रकार आजमावून लोकही दमले परंतु म्हणतात ना देवीचा महिमा अजब असावा तशीच काहीशी ही गोष्ट आहे.

बिहार येथील त्रिपुरासुंदरी मंदिराच्या भागातील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मंदिरात रोज रात्री देव्यांच बोलणं होत राहतं. या आदीशक्ती देवीची महत्वाची खासीयत म्हणजे, इथे नवरात्रीत देवीची घटस्थापना केली जात नाही किंवा नवरात्रीत आपल्याप्रमाणे कलश ठेवून देवीला पूजलं जात नाही; परंतु स्थानिकांच्या दैनंदिन जीवनातील देवीवरील श्रद्धेला अशी ख्याती आहे की, देवी प्रत्येक मनोकामना पूर्ण करते. नवरात्रीच्या दिवसांमधे मंदिरात मात्र विशिष्ट मंत्राच पठन करून जाप केला जातो.

या मंदिरात स्थित असलेल्या देवीच्या मूर्त्यांपैकी प्रधान मूर्ती ही राज राजेश्वरी त्रीपुर सुंदरी या देवीची आहे व इतर महाकाली, तारा, षोडसी, भुवनेश्वरी अशा तब्बल दहापेक्षा जरा अधिक देवींची स्थापना आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनी या गोष्टी प्रथमत: ऊजेडात आणल्या की, या मंदिरातून दररोज मध्यरात्री काही ना काही आवाज ऐकू येतात. सुरूवातीच्या काळात बरेच भाविकभक्त जेव्हा इथून रात्री प्रवास वगैरे करत असत तेव्हा त्यांना ही बाब म्हणजे, भूत-प्रेत यांची करणी असं काही वाटतं असतं.

राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी मंदिराचा दुसऱ्या पैलूचा विश्वास म्हणजे बोलण्याचा आवाज “निष्ठाबधा निशा” येथे स्थापित केलेल्या मूर्तींकडून येतो. जेव्हा मध्यरात्री लोक इथून जातात तेव्हा त्यांना आवाज ऐकू येतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ही प्रथा नाही तर मंदिराच्या आवारात काही शब्द गुंजत राहिल्याने हे घडते. शास्त्रज्ञांची एक टीम होती, ज्यांनी संशोधन केल्यानंतर सांगितले येथे मनुष्य नाही तेव्हा हवेच्या विशिष्ट दाबाने काहीशी पोकळी निर्माण होऊन शब्द फिरत राहतात.

शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे की, काहीतरी विचित्र नक्कीच घडते ज्यामुळे येथे आवाज ऐकू येतो. हे मंदिर 400 वर्ष जुने व प्रसिद्ध तांत्रिक भवानी मिश्रा यांनी या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून त्याच्या कुटुंबातील सदस्य या मंदिरात पुजारी आहेत. भवानी मिश्रा यांच्या तंत्रज्ञानाचा हा अद्भुत नमुना खरच वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker