Marathi

भुतांचे दिवे काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ? एक रहस्यमयी जंगल !

भुत अथवा आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम थरकापचं उडतो. पण आज आपण अशा एका रहस्यमय कथेबद्दल उलगडा करत आहोत; ज्याची कथा वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. उत्तर-पूर्व भारताविषयी सहसा आपल्याकडील भागात बऱ्याच गोष्टी अनभिज्ञ आहेत. त्यातलीच ही बातमी जाणून घेऊयात. पश्चिम बंगाल येथील “अलेयाचा प्रकाश” संबोधल्या जाणाऱ्या भुतांच्या उर्जेची ही आगळीच कथा. असं म्हटल्या जातं की, अलेयाच्या जंगलाजवळील भागात रात्रीच्या सुमारास किंवा अगदीच पहाटेच्या समयी एक प्रकारचा ऊजेड पहावयास मिळतो.

Loading...

त्या ऊजेडात अनेक मच्छीमारी करणारे मच्छीमार गायब झाल्याची आणि काही थेट मृत झाल्याच्या घटनांबद्दल चर्चा आहे. ह्या बाबीतला स्थानिक लोकांना दिलासा एकदा एके काळी शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला होता; पण तो असफल ठरला. आजही बऱ्याच प्रयत्नांनंतर या गोष्टीबद्दल फारसे पुरावे हाती आले नाहीत ज्यांवरून स्पष्ट होईल की, इथे चमत्कारिक वैज्ञानिक ताकद अस्तित्वात असेल, परंतु भुतांच्या ऊर्जेवरील विश्वास अधिकच घट्ट होत जाण्याला इथे घटणाऱ्या घटनाच साक्षीदार आहेत; असचं म्हणावं लागेलं.

Loading...

सविस्तर रित्या अलेया भूत ऊजेडाबद्दल म्हणालं तर पश्चिम बंगालच्या दलदली भागात अनेकदा रहस्यमय प्रकाश पडल्याच पाहिल्या गेलं आहे. येथील स्थानिकांच्या मते, हे काही मच्छीमारांचे आत्मे असून काही कारणास्तव मासेमारी करताना जे मरण पावले त्यांचे आत्मे भकटत राहिल्याचं सांगितले जाते. येथील लोक तर त्यांना चक्क “भुताचे दिवे” या नावे संबोधतात. असेही म्हटले जाते की, जे मच्छिमार हा प्रकाश पाहतात ते एकतर आपल्या दैनंदिन मार्गापासून दूर जातात किंवा जास्त काळ जगण्यास असमर्थ ठरतात.

या दलदलीच्या भागांतून अनेक मच्छिमारांचे मृतदेहही सापडले आहेत, परंतु केवळ भुतांमुळे असे घडले असेल यावर इथले स्थानिक प्रशासन विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यांच्या मते, असे अपघात मच्छीमारांशी वारंवार होत असतात. तथापि, अद्यापही ही रहस्यमय गुंतागुंत सुटलेली नाहीये. वैज्ञानिकांना असा संशय येतो की, मिथेन वायू बहुतेक वेळा दलदलीच्या भागात तयार होतो आणि ते प्रकाश तयार करण्यासाठी एखाद्या घटकाशी संपर्क साधतात; त्यामुळे होऊ शकतं की, वायूंच्या मिश्रीत नव्या तयार होणाऱ्या पदार्थामुळे माणसाच्या जीवास धोका निर्माण होऊन त्यांचा जीव जात असावा. परंतु या बाबीला खोडीत काढते ती पोस्टमार्टमची रिपोर्ट ज्यात मृत्यूचं गुढचं आजवर स्पष्ट झालेलं दिसलं नाही.

Loading...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close