लावणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणारी मराठी अभिनेत्री आज या कारणामुळे आहे अंथरुणाला खिळून !

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपटांमधील अभिनय, लावणी आणि नाटकांमधील अभिनय यांच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, सध्या मधू कांबीकर या चित्रपटसृष्टी पासून त्यांच्या आजारपणामुळे दुरावल्या गेलेल्या आहेत. त्या आपल्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळल्या आहेत.
28 जुलै 1956 रोजी मधू कांबीकर यांचा जन्म कांबी या गावी झाला. त्यांचे वडील नाटकातील कलाकार असल्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी खूप सारे यश संपादन केले. त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती.
एवढेच नाही तर तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणण्यासाठी व लावणीच्या इतिहास चाहत्यांना समजावा यासाठी लावणी संदर्भात जेवढे लिखित साहित्य आहे ते जमावून तमाशाचा इतिहास लोकांपर्यंत पाहचविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांना त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी खूप मोठी मदत केली. सर्व माहितीवर आधारित त्यांनी माझी सखी लावणी हा कार्यक्रम देखील सुरु केला होता.
त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण हे पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून घेतले. त्यांची कला ही पुण्यामध्येच फुली आणि रुजली गेली. त्यांचा हाच एक प्रामाणिक प्रयत्न होता की अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचावी. शापीत या 1982 प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रेक्षकांची त्यांच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. त्यानंतर त्यांनी बिनकामाचा नवरा, यशवंत, येऊ का घरात, झपाटलेला, विदूषक, मला घेऊन चला, माझा छकुला यांसारख्या खूप सार्या चित्रपटात काम केले.
27 नोव्हेंबर 2016 रोजी पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ प्रतिष्ठान यांनी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरामध्ये आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमात मधू कांबीकर यांना नृत्य करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. असे असतानाही त्यांनी त्या कार्यक्रमांमध्ये आपल्या नृत्याची सादरीकरण केले.
त्यांना त्यानंतर मेकअप रूम मध्ये गेल्यानंतर अर्धांगवायूचा झटका आला व त्यात त्यांचा उजवा हात बधिर झाला. तब्बल बारा वर्षांनंतर या कार्यक्रमात त्या नृत्य सादर करणार होत्या. प्रकृती खराब असल्यामुळे बारा वर्षांपूर्वी त्यांनीनृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी आपली कला सादर केली होती.लावणीसाठी योगदान देणाऱ्या या अभिनेत्री आज त्यांच्या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.