Marathi

या 7 गोष्टी करा आणि तुमचे वजन घटवा फक्त 15 दिवसांत ! उपाशी राहण्याची किंवा जास्त व्यायाम करण्याची मुळीच गरज नाही !

वजन कमी करणे खरोखर कोणतीही मोठी गोष्ट नाही. बहुतेक लोक आपल्या जीवनाचे वजन घडवण्याचा प्रयत्न चालू करतात, परंतु जास्त काळापर्यंत ते चालू ठेवत नाहीत. हे सर्वात मोठे कारण आहे ज्यामुळे लोकांचे वजन लवकर कमी होत नाही. आपण अतिरिक्त वजन कमी करू शकता. त्यासाठी आम्ही सांगितलेल्या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. वजन घटविण्यासाठी उपाशी राहण्याची किंवा हार्ड वर्कआऊट करण्याची गरज नाही.

जास्त पाणी प्या.
जास्त पाणी पिण्यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरा हाइड्रेटेड राहिल्यास हार्ट ब्लडचा चांगल्या प्रकारे पंप करून, ब्लड वेसल्सच्या मदतीने मांसपेशिशन्सपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे मांसपेशी अधिक चांगल्या प्रकारे काम करतात.त्यामुळे शरीरचा आकार कमी होण्यास मदत होते. दिवसभर ज्यूस किंवा सोडा घेण्याऐवजी जास्त पाणी प्यावे.

सकाळी बाहेर फिरायला जावे.
दररोज सकाळी फिरायला जावे. विशेषत: जेव्हा हिवाळ्याचे दिवस असतात तेव्हा फिरणे आपल्यासाठी खूप फायद्याचे असते. थंडीमध्ये सकाळी आपल्या उबदार अंथरुणातून बाहेर पडणे खूप कठीण असते. परंतु वजन कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे. दररोजच्या चालण्याने अतिरिक्त कॅलरी घडविण्यास मदत होते. म्हणून जर तुम्ही सकाळी उठून मॉर्निंग वॉल्कला गेल्यास तुमचे कमी होऊ शकेल.

अन्न बारीक चावून खावे.
आपण नेहमीच अन्न बारीक चावून खायला हवे. तुम्ही हळू हळू अन्न खाल्ले तर तुम्ही ओव्हर इटिंगपासून वाचू शकता. यामुळे तुमच्या शरीराला संदेश मिळतो कि तुम्ही पुरेसे अन्न खाल्लेले आहे. यामुळे तुम्हाला पोट भरण्याचा अनुभव येईल व तुम्ही जास्त अन्न देखील खाणार नाहीत. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत होईल.

जेवताना लहान प्लेटचा वापर करा.
जेव्हा आपण जेवण करता तेव्हा जेवणाची मात्रा मर्यादित ठेवणे आवश्यक असते. जर तुम्हाला प्लेट भरून जेवण करण्याची सवय असेल तर तुम्ही लहान प्लेट वापरु शकता. त्यामुळे तुम्ही जास्त जेवण करणारही नाही व तुम्हाला पोट भरल्याचा अनुभवही येईल.

पांढरे खाद्यपदार्थ खाणे टाळा.
व्हाइट फूड्स म्हणजे व्हाइट ब्रेड आणि मैद्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट असतात. याप्रकारचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. तसेच जंक फुड सुद्धा खाणे टाळावे.

तणावात राहू नये.
बर्‍याच वेळा असे झाले आहे की आपली डाएट जास्त नसते, परंतु आपले वजन वाढतच असते. त्यामागील कारण, स्ट्रेस व चिंता. तणावामध्ये आपण एकतर जास्त अन्न खातो किंवा जेवणच करत नाहीत. दोन्हीमुळे वजनात वाढ होते. त्यामुळे जास्त तणाव व चिंता करू नये.

पुरेशी झोप घ्यावी.
आपली झोप सुद्धा आपल्या वजनावर परिणाम करत असते. साधारणतः एका दिवसात 7-8 तास झोपेची आवश्यकता असते. अपुऱ्या झोपेमुळे मानसिक तणावात वाढ होते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker