Health

संधिवात सतावतोय मग करा हे सोपे घरगुती उपाय !

संधिवाताने त्रस्त लोक नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. सांध्यांमध्ये सूज येऊन ते कडक होऊन प्रचंड वेदनांच्या त्रासाला संधिवात म्हणतात. ऑस्टियोआर्थरायटिस हा सर्वात सामान्य प्रकारचा संधिवात आहे. रुमाटोईड संधिवात हा ऑटोइम्युन प्रकारच्या आजारात मानला जातो कारण ह्यात शरीरातील पेशी सांध्याच्या पेशींना शरीराबाहेरील धोकादायक घटक समजून मारून टाकतात.

सामान्यत :  डॉक्टर संधीवातासाठी अँटीइंफ्लामेट्री किंवा पेनकिलर गोळ्या देऊन उपचार करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे बऱ्याचदा साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. अशा वेळी नैसर्गिक उपाय निवडले जातात. हे उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

वजन कमी करा वाढलेले वजन संधिवातावर खूप मोठा परिणाम करू शकते. अतिरिक्त वजन आपल्या सांध्यावर अधिक दबाव आणते – विशेषत: आपले गुडघे, कूल्हे आणि पाय. वजन कमी केल्याने सांध्यावरील ताण कमी होऊन हालचाल सुधारेल, वेदना कमी होईल आणि भविष्यात सांध्याचे नुकसान कमी होईल.

व्यायाम करा वजन कमी करण्यासोबतच नियमित व्यायाम देखील ह्यापासून आराम मिळण्यास मदत करतो. नियमित हालचाल सांध्यामध्ये लवचिकता राखण्यास मदत करते. धावणे आणि चालणे यासारखे वजन कमी करणारे व्यायाम हानिकारक असू शकतात. त्याऐवजी, फार ताण न देणारे व्यायाम जसे की वॉटर एरोबिक्स किंवा पोहणे यासारख्या व्यायामाचा प्रयत्न करा.

ह्या गोष्टींचा वापर करा

 

कोरफड कोरफड ही वैकल्पिक औषधांमध्ये वापरल्या जाणार्या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे कोरफड नेहमीच सर्वांना परिचित आहे, त्वचेच्या उपचारासाठी हे लोकप्रिय आहे.

मांजरनखी : मांजरनखी ही आणखी एक अँटी-इंफ्लामेट्री औषधी वनस्पती आहे जी संधिवाताची सूज कमी करू शकते. ही औषधी वनस्पती उष्णकटिबंधीय द्राक्षांचा वेल आहे आणि त्याचा वापर इकन संस्कृतीशी संबंधित आहे. मांजरनखी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ही वापरली जाते.

निलगिरी : निलगिरीमध्ये असणारे टॅनिन संधीवाताची सूज आणि कारणे कमी करण्यास मदत करते. ह्याचा प्रभाव वाढवण्यासाठी निलगिरीसोबतच हिट पॅडचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

आलं : आल्याचा वापर हा अँटी-इंफ्लामेट्री म्हणून केला जातो. आल्याचा वापर रक्ताभिसरण वाढविण्यासाठी केला जातो, ज्यामुळे प्रभावित भागात उष्णता आणि हिलींग प्रॉपर्टीज निर्माण होतात.

हळद : हळदीमध्ये असणारे कुरकुमीन नावाचे रसायन संधीवातावर परिणामी ठरते. आहारात हळदीचा उपयोग सांधेदुखी वर उपयुक्त ठरतो.

भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker