Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत ‘भिवा’ ही भुमीका साकारून अगदी कमी कालावधीत मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा करणारा अभिनेता म्हणजेच संकेत कोर्लेकर हा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमीका साकारण्याची संधी आजवर खुप कमी कलाकारांना मिळाली आहे. पण संकेतला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आणि खय्रा अर्थाने तो एक सच्चा कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरातला एक भाग बनला.

चित्रपट तसेच मालिकेत सतत वेग वेगळ्या भुमीकेत दिसणाय्रा या अवलियाच्या जीवन प्रवासा बद्दल खुप कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेवू संकेतच्या जीवना विषयी बरच काही.

संकेत कोर्लेकर या ध्येयवेड्या कलाकाराचा जन्म रोहा या शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. संकेतच्या वडिलांना नेहमी वाटे की “संकेत मोठा होवून अभिनेता व्हावा’. म्हणून वयाच्या अवघ्या तिसय्रा वर्षी पासून रंगभूमीशी त्याची नाळ बांधली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक एक पात्री भुमीकेचे त्याने धडे घेतले. त्यानंतर त्याची गट्टी जमली ती स्पंदन या नाट्य संस्थेशी.

स्पंदन या नाट्य संस्थेने संकेत मधील हरहुन्नरी,हजरजबाबी कलाकाराला ओळखलं आणि त्याला मराठी पाऊल पडते पुढे,शिवबा,शान मराठीची,नटरंग सारख्या अनेक व्यावसायिक तसेच प्रायोगिक नाटकात अभिनय करण्याची संधी दिली. अनेक वर्ष रंगभूमीवर काम केल्या नंतर संकेतने वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्याने 2011 साली मुंबई गाठली. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी अनेक प्रोडोक्शन गाठू लागला अनेक ठिकाणी ऑडीशन देवू लागला.

पाचशे हून अधिक ऑडीशन दिल्या नंतर पहिल्यांदा त्याला गोळा बेरीज या चित्रपटात झंप्या या चहा वाल्याची भुमीका मिळाली. त्या चित्रपटात तो फक्त मोजून 15 सेकंद चहा ढवळताना दिसला. पण तो एवढ्याशा भूमिकेमुळे खचला नाही. तर स्वतःतील कमतरता जाणून त्याला सुधरवत अधिकाधिक प्रयत्न चालू ठेवले आणि अचानक आय.पी.एस सारख्या चित्रपटात त्याला प्रमुखु भुमीका साकारायला मिळाली.

पाचशे हून अधिक ऑडीशन दिल्यामुळे त्याच्यातील जिध्दीला सलाम टिकण्यासाठी संधी स्वतःहून धावून येणं याला नशीबच म्हणावं लागेल. त्यानंतर संकेत अधिक मेहनत करू लागला न खचता, न थकता ऑडीशन देण चालूच ठेवलं आणि त्याला दुसरी संधी मिळाली ते ‘अशी ही बनवा बनवी’ मालिकेत. पण दुर्दैवाने ती मालिका प्रदर्शित झाली नाही. पण त्याच्यातील एका सच्चा कलाकाराची मेहनत पाहून ‘अशी ही बनवा बनवी’ मालिकेच्या एक्झीगेट्यूव प्रोडूसरने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेसाठी संकेतचे नाव सुचवले. अनेक लुक टेस्ट नंतर त्याला महामानवाची भुमीका मिळाली आणि अतिशय कमी कालावधीतच तो लोकप्रिय बनला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवा नंतर तो अनेक मालिकेत झळकू लागला. ‘हम बने तुम बने’ मालिकेतील जयेश पटेल असो किंवा टकाटक सारख्या ब्लाॅकबस्टर चित्रपटातला खलनायक असो, अश्या वेगवेगळ्या भुमीकेतील प्रवास आता सुसाट सुरू आहे. वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवून त्याने स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध केलय.

सध्या तो ‘विठू माऊली’ या मालिकेत संत नामदेव यांच्या भुमीकेत साकारताना दिसतोय. खरच संकेत कोर्लेकर या मेहनती कलाकाराला लाख सलाम आणि पुढील प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker