Health

कढीपत्त्याचे हे अद्भुत फायदे तुम्हाला माहिती नसतील !

कढीपत्ता हा त्याच्या सुगंध आणि चवीसाठी भारतीय पाककलेत लोकप्रिय आहे. ह्याशिवाय कढीपत्ता वजन कमी करण्यासाठी देखील वापरला जातो. हे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि बी 2 ने परिपूर्ण आहेत. कढीपत्ता लोह आणि कॅल्शियमचा देखील चांगला स्रोत आहे. म्हणूनच अनेक पारंपरिक औषधांमध्ये ह्याचा उपयोग केला जातो.

Loading...

वजन कमी करणे : कढीपत्ता वजन कमी करण्यास मदत करते. ह्यातील कार्बाझोल अल्कॉइड्स वजन वाढविण्याविरूद्ध काम करतात आणि शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. कोशिंबीर, भाजी किंवा चटणीमध्ये ह्याचा वापर करून योग्य व्यायामाच्या संगतीने वजन कमी करण्यास ह्याचा फायदा होतो.

पचनास चांगले : कढीपत्ता बिघडलेल्या पोटावर उपचार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. वाळलेल्या कढीपत्त्याची बारीक पूड ताकातून घेतल्याने फायदा होतो. अतिसार, बद्धकोष्ठता यासारख्या आजारात फायदेशीर ठरतो. उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्याने आराम मिळतो. कढीपत्ता पाचनक्रिया वाढवण्यास मदत करते.

Loading...

गर्भावस्थेत चांगले : गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत स्त्रियांना सकाळी होणाऱ्या त्रासापासून आणि मळमळ पासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. कढीपत्त्यामुळे पाचक स्राव वाढण्यास मदत होते आणि मळमळ, उलट्या दूर होतात.

मधुमेहींसाठी संजीवनी : रक्तातील ग्लुकोजची पातळी प्रभावीपणे कमी करण्यासाठी कढीपत्ता मदत करतो. इंसुलिन निर्माण करणाऱ्या पेशींना संरक्षण देते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणार्या नुकसानापासून वाचवते. हा मधुमेह ग्रस्त लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

केसांची वाढ : कढीपत्ता केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊन नैसर्गिक रंगासह ते वाढवण्यास मदत करते. केस गळती आणि अकाली केस पिकणे ह्यांवर कढीपत्त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कोंडा कमी करण्यासाठीदेखील कढीपत्ता फायदेशीर आहे.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

 

 

Loading...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close