भारतातील या गावातील सर्व घरे आहेत काळ्या रंगाची, कारण ऐकून थक्क व्हाल !

आपण आपल्या घराचे रंगकाम करताना घर आकर्षक दिसावे म्हणून वेगवेगळ्या रंगांचा वापर करतो. घर रंगवताना काळा रंग हा काही अपवाद वगळता कुठेही वापरला जात नाही. संपूर्ण घर रंगवण्यासाठी कुणीही काळा रंग वापरत नाही. इतकेच नाही तर तेल पेंट, इमल्शन पेंट किंवा चुना रंग कोणत्याही कॅटलॉगमध्ये काळा शक्यतो काळा रंग नसतो कारण या रंगाची मार्केटमध्ये जास्त मागणी नसते.
परंतु छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावे आणि शहरात काळ्या रंगांची घरे सहज दिसतात. आदिवासी लोक अजूनही त्यांच्या घराच्या फरशी आणि भिंती काळ्या रंगाने रंगवितात. यामागे बऱ्याच साऱ्या कथा ह्या प्रचलित आहेत.
दिवाळी सणाच्या अगोदर सर्वजण आपले घर स्वच्छ करून रंगकाम करतात. यावर्षीही जशपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील लोक परंपरेनुसार काळ्या रंगाने आपल्या घरांना रंगवत आहेत. गावातील लोक याआधी काळ्या मातीने घर रंगवत असत. परंतु आता काली माती सहजपणे उपलब्ध होत नाही. म्हणून हे लोक टायर जाळून त्याच्या राखेपासून काळा रंग बनवून आपल्या घरांचे रंगकाम करतात.
समाजात एकरूपता आणण्यासाठी काळ्या रंगाने घरे रंगवतात.
एकसारखेपणा दाखविण्यासाठी आदिवासी आपली घरे काळ्या रंगाने रंगवतात. आदिवासी बाहेरील जगापासून दूर जंगलात होते तेव्हापासून आपली घरे काळ्या रंगाने रंगवत आहेत. त्याकाळी हे आदिवासी काळी माती वापरत असत. आजही गावांमध्ये काळ्या रंगाचे घर पाहून समजते कि हे घर आदिवासिंचेच आहेत. यामुळे आजही त्यांच्या समाजात एकरूपता टिकून आहे.
काळ्या रंगाची घरी असल्यामुळे या घरांमध्ये दिवसाही काळाकुट्ट अंधार असतो. घरात कुठे काय ठेवले आहे हे बाहेरील माणसाला समजूच शकत नाही. आदिवासींच्या घरांमध्ये जास्त खिडक्या नसतात. त्यांचा घरांमध्ये प्रकाश येण्यासाठी बारीक देवळी बनविलेली असते. त्यामुळे आदिवासींच्या घरात चोरी होण्याची शक्यता फारच कमी असते.
काळ्या रंगाचे काही वैशिष्ट्येही आहेत. काळ्या चिखलाने रंगविलेल्या भिंती या सर्व प्रकारच्या हवामानात आरामदायी असतात. याचप्रमाणे काळ्या रंगांच्या भिंतींवर आदिवासी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे देखील काढू शकतात. हा देखील काळ्या रंगाचा आदिवासींना एक फायदा आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.