Bollywood

आलिशान घर आणि गाड्या, अभिनेता बॉबी देओलकडे आहे एवढी संपत्ती, संपूर्ण संपत्तीची किंमत ऐकून थक्क व्हाल!

बरीच वर्षे काम केल्यानंतर सेलिब्रिटी असणाऱ्यांच्या चाहत्यांना त्यांची संपत्ती किती ? हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असते. एक असा अभिनेता आहे की त्याचं करियर खालीवर झालेलं आहे. खूप संघर्ष केलेला आहे. बॉबी देओल यासध्या चर्चेत आलेल्या अभिनेत्या बद्दल संपत्ती जाणून घेऊयात.

बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता बॉबी देओल सध्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. बॉबी हा धर्मेंद्र यांचा छोटा मुलगा आणि सनी देओलचा छोटा भाऊ आहे. ५२ वर्षांच्या बॉबीने इंडस्ट्रीतील २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

१९९५ मध्ये बॉबीने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. पण आता आश्रम मध्ये बाबाचा असा काही रोल केला आहे की सर्वांनी खूप पसंद केलेलं आहे. आणि भूमिका ही सुपरहिट झालेली आहे.

काही काळानंतर फ्लॉप चित्रपटांमुळे बॉबीच्या करिअरला ब्रेक लागला. पण हा ब्रेक फार काळ काही टिकला नाही. आश्रम ने तो भरून काढला.

काही वर्षांनंतर बॉबीने सलमान खानच्या ‘रेस ३’ या चित्रपटातून कमबॅक केलं. मात्र आता त्याने ‘आश्रम’ या वेब सीरिजद्वारे दमदार पुनरागमन केलं आहे. वेबसिरीज खूप लोकांनी पाहिलेली आहे. लाखो चाहते सध्याही पाहत आहेत.

बॉबी देओल तब्बल ६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून बॉबीची सर्वाधिक कमाई होते. बॉबीला आलिशान व महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्याजवळ रेंज रोव्हरपासून लँड क्रूझरपर्यंत अनेक आलिशान गाड्या आहेत.

मुंबईतल्या विलेपार्ले या ठिकाणी बॉबीचा आलिशान बंगलासुद्धा आहे. या बंगल्याची किंमत जवळपास सहा कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं.

बॉबीच्या पत्नीचं नाव तान्या असून या दोघांना दोन मुलं आहेत. एवढंच नव्हे तर बॉबी देओल याच संपत्ती मध्ये अजून काही इनव्हेंसमध्ये वाढ करणार आहे. बॉबी देओल 83 मध्ये सुद्धा खूप वेगळा अभिनय करताना दिसला होता. त्याला येणाऱ्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker