BollywoodBollywood ActorBollywood ActressEntertainmentMarathi

काही क्षणात वेगळ्या झाल्या या बॉलीवूड मधील प्रसिद्ध जोड्या, या अभिनेत्रीचा तर…

मित्रांनो, बॉलीवुड जगतातील अनेक लव्हस्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात. यापैकी काही लव्हस्टोरीज शेवटपर्यंत सुखी व आनंदी आयुष्य जगतात. परंतु असे बरेच बॉलीवुड इंडस्ट्रीमधील कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या नात्याची सुरुवात तर केली, मात्र काही कारणास्तव ते एकमेकांची साथ निभावू शकले नाही.अशाच काही सुपरङुपरहिट जोड्यांच्या अपूर्ण लव्हस्टोरी आम्ही आपल्याला आज सांगणार आहोत.

ऋतिक रोशन – करीना कपूर

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि अप्रतिम ङान्स स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता ऋतिक रोशन याला तर आपण सारेच ओळखतो. तसेच इंडस्ट्रीमधील सुंदर व ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर जी बेबो या नावाने प्रसिद्ध आहे. ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपटांत काम केले आहे. परंतु “कभी खुशी कभी ग’म” या चित्रपटातून यांची जोङी प्रेक्षकांना आवडायला लागली. ऋतिक आणि करीनाची प्रेमकहानी तुम्ही देखील ऐकली असेल. मॉडर्न, फॅशनेबल करीना आणि चॉकलेट हिरो ऋतिक यांची लवकेमिस्ट्री खूपच रोमांटिक होती.

आयुष्याच्या एका वळणावर या दोघांनीही आपल्या प्रेमाची स्वप्नं सजवली होती. परंतु यांचे नाते काही कारणाने टिकू शकले नाही. नंतर ऋतिक रोशनने आपली बालमैत्रीण सुजैन खान हिच्या सोबत विवाह केला. तर करीना कपूर ने बॉलीवुडचे छोटे नवाब सैफ अली खान यांच्या सोबत सप्तापदी घेऊन एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऋतिक रोशनचा आपल्या पत्नीसह घटस्फो’ट झाला आहे. तर करीना कपूर आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.

करिश्मा कपूर – अभिषेक बच्चन

बॉलिवुड विश्वातील सर्वांत प्रसिद्ध सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन व विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय यांची जोङी ही सर्वांचेच लक्ष वेधून घेते. अभिषेक बच्चन यांचे चित्रपट सृष्टीत फारसे मन रमले नाही, परंतु एक उत्तम उद्योजक म्हणून ते नावारूपास आहेत. कपूर परिवारातील “राजा हिंदुस्तानी” या चित्रपटातून आपली उत्तम ओळख बनवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. अभिषेक व करिश्मा यांची प्रेमकहानी तर आपल्याला माहित आहे. या सुंदर कपलने एकमेकांसोबत जीवन व्यतीत करण्याची स्वप्नं देखील पाहिली होती. एवढचं नाही तर, त्यांचा साखरपुडा पण झाला होता.

परंतु अभिषेक बच्चन यांची आई जया बच्चन यांना करिश्मा पसंत नसल्याने अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले, असे म्हणतात. मात्र अभिषेक व करिश्माने आपल्या नात्याचा कोणत्याही प्रकारे उलगडा केला नाही. शेवटी म्हणतात ना, नशिबासमोर कुणाचंही काही चालत नाही.

मीनाक्षी शेषाद्री – कुमार सानू

1980 च्या दशकात आपल्या मनमोहक अभिनयाने व अप्रतिम सौंदर्याने सर्वांना आपले वेङ लावलेली अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व पॉप्युलर सिंगर कुमार सानू यांच्या लव्हस्टोरीची गोष्टच काही निराळी होती. तेव्हाच्या काळात हे एक फेमस कपल होते. मीनाक्षीच्या सौंदर्याकङे आकर्षित झालेले कुमार सानू यांची अनेक प्रेमप्रकरणे देखील होती. परंतु मीनाक्षी शेषाद्री सोबत त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. पुढे मीनाक्षी अमेरिकेतील एका प्रतिष्ठीत व्यक्ती सोबत विवाहबद्ध झाली. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला आपण सध्या कलर्स टिवी वरील जगप्रसिद्ध हिट शो बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाला आहे.

संजय दत्त – माधुरी दीक्षित

मराठमोळी बॉलीवुड इंडस्ट्री मधील धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे तर संपूर्ण जगभरात लाखों चाहते आहेत. तसेच इंडस्ट्रीमधील मुन्नाभाई म्हणजेच अभिनेता संजय दत्त यांनी एकत्रितपणे बरेच हिट चित्रपट दिले आहेत. यांची लवकेमिस्ट्री तर इतकी सुंदर होती की, हे दोघेही एकमेकांशिवाय क्षणभरही जगू शकत नव्हते. परंतु संजय दत्तला एक आ’रो’पी म्हणून ओळखले जाऊ लागल्याने माधुरी त्याच्या पासून दूर राहू लागली. शेवटी ही दोन प्रेमपाखरं इच्छा नसतानाही एकमेकांपासून दुरावली. माधुरीने मग अमेरिकेत वास्तव्यास असलेले श्रीराम नेने यांसोबत लग्न करून सुखी संसार थाटला. सध्या संजय दत्त हे क’र्क’रो’ग या आ’जा’रा’ने त्र’स्त आहेत, त्यांचे सर्व चाहते मनापासून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.

तुम्हांला आमचा हा लेख कसा वाटला, हे आम्हांला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपल्या वाचकांसाठी असेच मनोरंजक लेख आम्ही नेहमी या वेबसाईटवर अवश्य उपलब्ध करू. त्यासोबतच आमच्या फेसबुक पेजला देखील लाईक करा, जेणेकरून तुम्हांला मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स दररोज मिळतील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker