Marathi

रामायण मधल्या सीता ची मुलगी आहे खूपच सुंदर फोटो पाहून तुम्ही चक्रावून जाल !

मित्रांनो रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण हि सिरीयल एकेकाळी खूप गाजली. प्रेक्षकांनी या सीरियलला प्रचंड प्रेम दिलं. तुम्हीदेखील कधीतरी ही सिरीयल नक्कीच बघितली असेल. जेव्हा हि सिरीयल लागायची तेव्हा लोकं हातातील सर्व काम सोडून टीव्हीसमोर जाऊन बसायची. तेव्हा गावामध्ये एक किंवा दोन टिव्ही असायचे त्यामुळे ज्याच्याकडे टीव्ही होता त्याच्याकडे रामायण बघण्यासाठी प्रचंड गर्दी होत असत.

टीव्हीवर राम आणि सीता दिसले की लोक त्यांची पूजा करत असत. त्यांना हार फुल वाहिली जायची एवढी ती सिरीयल प्रचंड गाजली होती. या सिरीयल मध्ये सितेची भूमिका दीपिका चिखलिया या अभिनेत्रीने केली होती. प्रेक्षकांनी तिला अगदी डोक्यावर उचलून धरलं होतं. मित्रांनो तुम्हाला दीपिका चिखलिया माहिती असेलच परंतु तुम्हाला तिच्या मुलींबद्दल माहिती आहे का? आज आपण या लेखामध्ये त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत……

मंडळी दीपिका चिखलिया हिचा जन्म 29 एप्रिल 1965 मध्ये महाराष्ट्रात झाला. दीपिकाने तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. पुढे दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. दीपिका चिखलीया यांना दोन मुली देखील आहेत. यातील एका मुलीचे नाव निधी तर दुसऱ्या मुलीचे नाव जुही असे आहे. दीपिका यांची मोठी मुलगी निधीला अभिनय क्षेत्रामध्ये प्रचंड रुची आहे आणि लहान मुलगी जुहीला खेळांमध्ये प्रचंड आवड आहे.

दीपिका यांच्या दोन्ही मुली स्वतः दीपिका यांच्यापेक्षा खूपच सौंदर्यवान आहेत. तुम्ही फोटोमध्ये तर हे सर्व पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker