Marathi

या चित्रपटामुळे दीपिका पदुकोणचे आयुष्य कायमचे बदलून गेले ! दीपिकाने स्वप्नातही विचार केला नव्हता !

बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या यशामागे खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात. त्यांचे काही चुकीचे निर्णय त्यांचे पूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकतात तसेच त्यांचे काही चांगले निर्णय त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात. दीपिका पदुकोण हि बॉलीवूडमधली एक प्रमुख अभिनेत्री आहे. तिने तिच्या चाहत्यांवर आपल्या अभिनयाने छाप सोडलेली आहे.

दीपिका पदुकोनने बॉलीवूडमध्ये आज १३ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. तिने बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण करून आज ती सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झालेली आहे. दीपिकाने खूप साऱ्या चित्रपटांत काम केलेले आहे. दीपिकाने सर्वात प्रथम एका कन्नड चित्रपटात काम केलेले होते. त्या चित्रपटाचे नाव ऐश्वर्या असे होते. २००६ साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाददेखील मिळाला पण, हा चित्रपट दीपिकाला विशेष अशी ओळख देऊ शकला नाही.

त्यानंतर दीपिकाचा दुसरा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाचे नाव होते ओम शांती ओम. या चित्रपटातून दीपिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात दीपिकाने अभिनेता शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळाली व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चित्रपटात दीपिका पदुकोनने केलेले काम पाहून सर्वांनी तिची प्रशंसा केली. चित्रपटात दीपिकाने शाहरुखच्या गर्लफ्रेंडचे पात्र साकारलेले होते. या चित्रपटाने दीपिकाची अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली.

ज्या वेळी ओम शांती ओम चित्रपट रिलीज झाला होता, त्याच वेळी संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला सावरिया हा चित्रपटदेखील रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हे दोघेही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होते. एकीकडे शाहरुख खानबरोबर बॉलीवूडमध्ये ओळख नसलेली दीपिका पदुकोण तर दुसरीकडे बॉलीवूड कलाकारांच्या मुलांचा चित्रपट.

सर्वांचे असे मत होते कि सावरिया पुढे ओम शांती ओम चित्रपट तग धरणार नाही. परंतु परिणाम पूर्णपणे वेगळा निघाला. ओम शांती ओम पुढे सावरिया चित्रपट चांगलाच आपटला. सावरियाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. याउलट ओम शांती ओम चित्रपट हिट ठरला.

ओम शांती ओम चित्रपटानंतर दीपिकाने खूप सारे चित्रपट केले. यातील बरेच चित्रपट फ्लॉप झाले व काही हिट देखील झाले. दीपिका आपली एक वेगळी ओळख तयार करण्यात यशस्वी ठरली. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये करियर करून आपल्या आयुष्याला एक नवी कलाटणी दिली.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker