Health

सकाळी सकाळी नाश्ता/जेवण करण्याचे हे फायदे माहित आहेत का ?

न्याहारी किंवा नाश्ता हे एक महत्वाचे भोजन मानले जाते कारण तो रात्रभराचा उपवास खंडित करतो, ग्लूकोजचा पुरवठा पुन्हा भरतो आणि दिवसभर आपल्या उर्जेची पातळी कायम ठेवण्यासाठी इतर आवश्यक पोषक गघटक शरीरास पुरवतो. परंतु सध्याच्या जीवनात आपण ‘वेळ’ ह्या गोड कारणाखाली सकाळी खाणे टाळतो. परंतु तुम्हाला माहिती का न्याहारी चुकवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे.

काय आहे नाष्ट्याचे महत्त्व? : ग्लूकोज हा शरीराचा उर्जा स्त्रोत आहे. हे आपण खाल्लेल्या कार्बोहायड्रेट्समधून मिळवले जाते. जर आपण 12 तासांपर्यंत अन्नाशिवाय असाल तर आपल्या शरीरातील ग्लाइकोजेनचे प्रमाण कमी होत जाते. ग्लायकोजेन हे ग्लूकोज आहे जे आपल्या स्नायूंमध्ये आणि यकृतमध्ये जमा होते. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तिथून ते रात्रभर हळूहळू सोडले जाते. त्यामुळे सकाळी वेळेवर केलेला नाष्टा ह्या सर्व ऊर्जा स्रोताचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते व मेटबॉलिजम नीट ठेवते.

नाष्टा दिवसभरासाठी लागणाऱ्या पोषकतत्वांचा उत्तम स्त्रोत असतो. ज्यामुळे ऊर्जा कायम ठेवण्यास मदत होते. नाष्त्यामध्ये शक्यतो प्रोटिन्सने भरपूर पदार्थांचा समावेश असावा. हे प्रोटिन्स नंतर सेरोटॉनिनसाठी लागणारे प्रिकरसर्स (पूर्ववर्ती) तयार करतात. ज्यामुळे मेंदू तुम्हाला आनंदी आणि उत्साही ठेवणारे हार्मोन्स निर्माण करतो.

हृदयावर परिणाम : सतत नाश्ता टाळल्याने उच्च रक्तदाब 27% पर्यंत वाढू शकतो. शिवाय हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक ह्याचा धोका ही वाढतो. मेंदूवर परिणाम : “फिजिओलॉजिकल बिहेवियर” जर्नलनुसार, ब्रेकफास्ट वगळल्यामुळे मूड आणि उर्जा यावर चांगलाच विपरीत परिणाम होतो. जे लोक न्याहारी घेण्यास पूर्णपणे टाळतात ते खूप लवकर थकतात शिवाय त्यांची स्मरणशक्ती ही खूपच कमी असे.

मधुमेह : जे लोक सकाळी खाणे टाळतात त्यांच्यात मेटाबॉलीजम क्रिया असुरळीत दिसून येते. त्यामुळे त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker