Marathi

बजरंगबली हनुमान आजही जिवंत आहेत ? जाणून घ्या त्यांच्या आस्तित्वाविषयी !

तुम्हाला आम्ही आज एका अशा गोष्टीचं रहस्य सांगणार आहोत, जी ऐकताच पुन्हा एकदा तुमचा आध्यात्मावरील असलेला विश्वास अधिकच दृढ होईल. ही गोष्ट आहे बजरंगी हनुमानाच्या आस्तित्वाविषयी. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तर “हनुमान” चराचरात अजरामर आहे. तर मग जर हनुमान जिवंत आहेत तर त्यांचं शरीर अथवा ते ज्या गोष्टीत वास करतात ती गोष्ट कोठे वा कोणती आहे? हे प्रश्न आपल्याला पडतातच. तर आम्ही याचाच खुलासा इथे करत आहोत.

“हनुमान” यांना कलयुगाचे देव मानल्या जाते. त्यांना जे वरदान मिळालं ते रामायणातल्या काळात. या काळात भगवान श्री हनुमान हे मर्यादापुरुषोत्तम रामाचे निसिम्म भक्त होते. रामाच्या कैक अशा गोष्टींसाठी हनुमान काहीही करायला तयार असतं, आपल्याला एक गोष्ट माहीतच आहे रामाची अंगठी माता सितेपर्यंत पोहचवून लंकेला आग लावणारे आपले भगवान हनुमानचं होते. साक्षात लक्ष्मणाच्या जिव जाईल अशा परिस्थितीत हनुमानाला जडीबुटी आणायला सांगितली असताना वेळ कमी होता म्हणून हनुमान यांनी चक्क संपूर्ण पर्वतच उचलून आणला होता.

हनुमान लहान असताना तर थेट सूर्याला गिळंकृत करायला निघाले होते. अशा या बलशाली व शक्तीच प्रतिक असणाऱ्या भगवान हनुमानाच्या आज कलयुगात जिवंत असल्याने आपल्याला त्याबद्दल नक्कीच ओढ निर्माण होते. हिंदू धर्मात जितके ग्रंथ अथवा महापुराणं सापडतात त्यात कुठेही भगवान हनुमानाने आपलं शरीर त्याग केल्याचा उल्लेख आढळत नाही.

पौराणिक ग्रंथानुसार असं ठळक होतं की, कलयुगाच्या संरक्षणार्थ हनुमानाला अमरत्व देण्यात आलं. सध्या काही व्हिडीओ क्लीप्स अशा व्हायरल होत आहेत की, ज्यात हनुमानाच्या आस्तित्वाची महिमा उमटवली जात आहे. तर पाहुयात एक बाब या व्हायरल व्हिडीओजवर  हिमालयातील काही नद्यामंधे काही व्हिडीओज शूट करत असताना नद्यांमधील पाण्यांच्या अचानक मोठ्या आकारातील वेगळ्याच हालचाली दिसून आल्या त्यावरून अनेकांच मत आहे की, हिमालयात भगवान हनुमानाच वास्तव्य आहे.

सध्या एक रहस्य आणखी पुढे येतयं ते म्हणजे, श्रीलंकेत एका आदीवासी व्यक्तीजवळ हनुमानाच्या असण्याचं ठिकाण माहित आहे. परंतु हा व्यक्ती सर्वसामान्य लोकांपासून आजवर लपतछपत जीवण जगतो आहे. दर ४१ वर्षांनी भगवान हनुमान स्वत: त्या व्यक्तीला दर्शन देतात. यावर श्रीलंकेतील लोकांचा अफाट विश्वास आहे. हनुमानांच्या असण्याचे दावे अशा आणखी काही व्हीडीओजमधून पुढे आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker