Health

बाजारातून खरेदी केलेल्या अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखाल ?

आजकालच्या फसवणुकीच्या जगात शुद्ध गोष्टी भेटणे फार कठीण झाले आहे. अन्नातील भेसळ तर आपल्यासाठी नवीन नाही. पण अशावेळी काय करावे? अन्नातील भेसळ जाणून घेण्यासाठी हे प्रयोग नक्की करून पाहा.

दुधात युरियाची भेसळ : दुधात पाणी मिसळून भेसळ होते हे आपण सर्वच जाणतो पण ह्यात युरिया ही टाकला जातो हे तुम्हाला माहिती का? युरिया असलेल्या दुधाचे सेवन जीवावर बेतु शकते. अशी ओळखा भेसळ- टेस्ट ट्यूबमध्ये किंवा छोट्या काचेच्या भांड्यात एक चमचे दूध घ्या. त्यात ½ चमचे सोयाबीन किंवा चण्याची पावडर घाला. हे मिश्रण हलवून सामग्री पूर्णपणे मिसळा. काही मिनिटानंतर त्यामध्ये लाल लिटमस कागद बुडवा. एक मिनिटानंतर कागद काढा. लाल ते निळ्या रंगात रंग बदलणे हे दुधात युरियाची उपस्थिती दर्शवते.

खोबरेल तेलात इतर तेलाची भेसळ : रेफ्रिजरेटरमध्ये खोबरेल तेलची एक छोटी बाटली ठेवा. ह्यात जर नारळाच्या तेलाऐवजी इतर कुठले तेल असेल तर ते तेल सोडून नारळ तेल घट्ट झालेले दिसून येईल.

साखरेमध्ये किंवा मिठामध्ये खडूची भुकटी किंवा युरियाची भेसळ : पाण्यामध्ये साधारण 10gm साखर किंवा मीठ विरघळून थोडा वेळ ठेवा. ह्यात हर खडूची भुकटी किंवा युरिया मिसळलेला असेल तर तो बुडाशी जमा झालेला दिसून येईल. मधात साखरेची भेसळ : कापसाचा छोटा बोळा मधात बुडवावा. हा कापूस नंतर जाळून पाहावा. त्यात जर साखर असेल तर मध सहज जळणार नाही त्यातील पाणी तडतड आवाज करेल.

हळदीमध्ये शिस्याची भेसळ : मसाला बनवण्यासाठी बऱ्याचदा हळद वापरली जाते. हळद मुळात थोडीशी काळसर असल्याने ही भेसळ उघड्या डोळ्यांनी ओळखण्यास थोडे अवघड जाते. हळद पाण्यामध्ये टाकावी जर त्यात शिस्याची भेसळ असेल तर पाण्याचा रंग बदलायला लागतो.

मिरची पावडर मध्ये हळदीची आणि रंगाची भेसळ : बऱ्याचवेळा हळदीला लाल रंग किंवा विटेची भुकटी टाकून मिरची पावडर म्हणून विकली जाते. अशावेळी ही पावडर पाण्यात मिसळून थोडा वेळ ठेवा. भेसळ असेल तर पाण्याचा रंग बदललेला दिसून येईल.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker