News

असे IAS अधिकारी ज्यांच्या कार्य व कर्तव्यनिष्ठेचा तुम्हाला नक्की अभिमान वाटेल…

इंडियन अडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस अर्थात आयएएस हे देशातील अतिशय उच्च व तितक्याच जबाबदारीचे पद आहे. देशाच्या विकासात, सुरळीत कार्यकारभारात कर्तव्यदक्ष अधिका-यांचा हातभार अतिशय मोलाचा असतो. सामाजिक समस्यांना तोंड देत त्यावर मार्ग काढून आपण खरे लोकसेवक आहोत, याची शाश्वती देणारे हे अधिकारी! जाणून घेऊया अशाच तत्पर अधिका-यांबद्दल…

१. राज यादव : २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राज यादव यांनी सिक्कीममधील ५ गावांना दत्तक घेऊन त्यांतील जवळपास ७५०० लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले. शाळांची दुरावस्था, वीजपुरवठा-पाणीपुरवठा यांची अनिश्चितता, विकासाचा अभाव असलेल्या या राज्याचा कायापालट करण्यात या आयएएस अधिका-याने पुढाकार घेतला. अशा या कर्तव्यनिष्ठ अधिका-याला मनापासून सलाम!

२. शशांका अला : आयएएस अधिकारी असलेल्या शशांका यांनी मिझोराममधील कुपोषणाची समस्या सोडवण्यात योगदान दिले आहे. मिझोरामच्या उपायुक्त असताना त्यांनी आपल्या एक वर्षीय मुलाला अंगणवाडीत घातल्यावर घरी येताना तो कच्ची डाळ व तांदळाचे पाकिट घेऊन येत असे. चौकशीअंती त्यांना कळाले की मिझोराममध्ये बालकांमधील कुपोषणाची समस्या तीव्र असून त्यावर उपाययोजना होणं अतिशय गरजेचं होतं. त्यांनी परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करुन ‘कन सिकूल, कन हुआन’ म्हणजेच ‘माझी शाळा, माझं शेत’ ही अभिनव कल्पना राबवली. आज त्यांचा हा प्रोजेक्ट ७१३ शाळा व अंगणवाड्यांमध्ये चालू असून कुपोषणासोबत त्यांचा हा लढा अविरत चालू आहे!

३. संदीप नंदुरी : तमिळनाडूतील थुथूकुडीचे जिल्हाधिकारी संदीप नंदुरी यांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरु केला आहे. समाजातील दिव्यांग लोकांना समान वागणूक मिळावी व तेसुद्धा आपल्या समाजाचाच भाग असल्याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून संदीप नंदुरी यांनी ‘कॅफे एबल’ नावाचे एक कॅफे सुरु केले आहे. हे कॅफे १२ दिव्यांग लोकांकडून चालवले जाते. अतिशय प्रशिक्षित असलेले अनेक दिव्यांग या माध्यमातून मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यांना एक संधी देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य संदीजींनी केले आहे.

४. अथर आमिर खान : राजस्थानातील बालविवाह व त्यातून निर्माण होणारे अनेक सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे महत्वपूर्ण पाऊल मुळच्या जम्मूमधील असलेल्या अथर खान या तरुण आयएएस अधिका-याने उचलले आहे. राजस्थानच्या भिलवाडा येथील बालविवाहाची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शिताफीने निर्णय घेतानाच मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अंगणवाडीचे शिक्षक, कर्मचारी, ग्रामविकास समितीमधील सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे.

५. आशिष सिंग : दरवर्षी होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात इंदौर सलग तीन वर्षे (२०१७-१९) अग्रेसर राहिले आहे. कच-याच्या समस्येला तोंड देण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी आयएएस आशिष यांनी विविध वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला. इंदौर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी जवळपास १३ लाख मेट्रीक टन कच-यावर प्रक्रिया करुन साधारणपणे १०० एकर जागा कचरामुक्त बनवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान दिले आहे!!

या व अशा सर्व कर्तव्यदक्ष अधिका-यांना Viarl Kekda चा मानाचा मुजरा !!!

© Nikita Patharkar

Bhaukaal (2020) MX Player Hindi Webseries

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker