Health

टाचांवर भेगा पडल्यात मग करा हे सोपे घरगुती उपाय !

कोरडे पाय किंवा पायाला भेगा पडणे आपल्या शरीरावर लक्ष न देण्याचे लक्षण आहे आणि बहुतेक स्त्रियांसाठी हे वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. पायाला तेल ग्रंथी नसल्यामुळे पायांची त्वचा कोरडी होते. या कोरडेपणामुळे त्वचेला भेगा पडतात. मॉइश्चरायझेशनचा अभाव, प्रदूषणाचे अतिरेक, मधुमेह, थायरॉईड आणि सोरायसिससारख्या काही वैद्यकीय परिस्थितीमुळे ही समस्या उद्भवू शकते.

लिंबू, गुलाबजल आणि ग्लिसरीन : ह्याचे मिश्रण पाण्यात टाकून त्यात पाय ठेवावे. लिंबाच्या रसाचे ऍसिडिक गुणधर्म कोरडी त्वचा बरे करण्यास मदत करतात. लिंबाच्या अम्लीय गुणधर्मांबरोबरच गुलाबाच्या पाण्याचे आणि ग्लिसरीनचे मिश्रण देखील फाटलेल्या टाचांवर एक प्रभावी उपचार असल्याचे दिसून येते. ग्लिसरीन त्वचेला मऊ करते तर गुलाबाच्या पाण्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात जे भेगा बरे करण्यास मदत करतात. कधी-कधी लिंबू जळजळ आणि कोरडेपणास कारणीभूत ठरतो.

वनस्पती तेल : हे तेल रोज झोपण्यापूर्वी पायाला लावावे. हायड्रोजनेटेड वनस्पति तेलातील फॅट्स त्वचेचे पोषण करतात आणि पाय बरे करतात.

केळी आणि ऍव्होकाडो : ह्याचे मिश्रण बनवून ते पायाला लावावे आणि नंतर धुवावे. ऍव्होकाडो हे कोरड्या त्वचेला दुरुस्त करण्यात मदत करते. केळी एक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते आणि आपली त्वचा मऊ आणि नितळ करते.

मध : गरम पाण्यात मध टाकून त्यात थोडावेळ पाय ठेवावे. मध एक नैसर्गिक एंटीसेप्टिक हे भेगा बऱ्या करून त्वचेचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात.

नारळाचे तेल : नारळाचे तेल रोज झोपण्यापूर्वी पायाला लावावे. हे त्वचेसाठी हायड्रेटिंग आहे. कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते.

कोरफड : कोरफडीचा गर पाण्यात टाकून किंवा सरळ पायाला 4-5 दिवस लावावा. हे मृत पेशी व कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. शिवाय पायाच्या भेगा कमी करून कोलेजन वाढवण्यास मदत करते. त्यामध्ये असलेले अमीनो ऍसिड त्वचा मऊ करतात.

-भक्ती संदिप
(Nutritionist at Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker