Health

अश्या प्रकारे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.

भारतात स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अनुवांशिकतेमुळे होणार कर्करोग रोखता येत नसला तरी इतर कारणामुळे होणाऱ्या ह्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.

अलसी किंवा फ्लेक्सीड : फ्लॅक्ससीडमध्ये आढळणारे ओमेगा -3, लिग्नान्स आणि फायबर स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत असलेल्या कर्करोगाच्या पेशींपासून संरक्षणात्मक कवच तयार करतात. दही, कोशिंबीर ह्यामध्ये ह्याचा वापर करू शकता.

लसूण : हा कर्करोगाशी संबंधित घटकांना रोखण्यासाठी समृद्ध स्त्रोत. ह्यात अॅलियम असते, लसूण आणि कांदा हे कोलोरेक्टल आणि प्रोस्टेट कर्करोगासारख्या कर्करोगाच्या इतर प्रकारांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका टाळतात. लसूण आणि कांदे इटालियन, स्पॅनिश, भारतीय, थाई आणि चिनी पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांमध्ये आढळतात. दररोज सकाळी लसूणचा तुकडा खाल्ल्याने फायदा होतो.

डाळिंब : स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी हे अत्यंत उत्तम आहे. ह्यात पॉलिफेनॉल नावाचे ऍसिड असते ज्यात एंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे कर्करोगाच्या वाढीस प्रतिबंधित करते. त्यामुळे ह्याचा आहारात नक्की समावेश करा.

फुलकोबी : फुलकोबी सल्फरोफेन आणि इंडोल्सने परिपूर्ण असते, हे अनेक मार्गांनी पेशींच्या वाढीचे नियमन करते आणि स्तन, मूत्राशय, लिम्फोमा, फुफ्फुसांच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यास मदत करते.

हळद : आपल्याकडे सहज उपलब्ध असणारी हळद ही कर्क्युमिन नावाच्या रसायनाने भरपूर असते. हे रसायन स्तन, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, फुफ्फुस आणि त्वचेचा कर्करोग रोखू शकतो. एक चिमूटभर हळद कर्करोगास दूर ठेवण्यास मदत करते.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker