Marathi

भारतातल्या या दुर्मिळ चहा पावडरला आहे जगभरात मागणी ! किंमत ऐकून थक्क व्हाल !

भारतातील प्रत्येक घरामध्ये सकाळी-सकाळी गरमागरम चहा तयार होतो.भारतात जवळपास सर्वांच्याच सकाळची सुरवातही चहानेच होते. चहाच एकच घोट हा तुम्हाला फ्रेशनेसचा अनुभव देत असतो. तुम्ही चहा बद्दल बोलत असाल आणि आसामचा उल्लेख झाला नसेल तर तो विषय पूर्ण होऊच शकत नाही.

आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये खूप साऱ्या चहाच्या प्रजातींची शेती केली जाते. एवढ्यातच चहाच्या एका दुर्मिळ प्रजातीने खूप मोठे रेकॉर्ड केले आहे. या चहा पावडरला लिलाव केंद्रावर चक्क ७५ हजार रुपये किलो एवढा भाव मिळाला आहे. हि खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

या दुर्लभ चहा पावडरचे नाव आहे मनोहारी गोल्ड टी. हि एक खास पद्धतीची दुर्मिळ चहा पावडर आहे. या चहा पावडरला गुवाहाटीच्या लिलाव केंद्रावर ७५ हजार रुपये प्रति किलो एवढ्या भावाने विकण्यात आलेले आहे. हि चहा पावडर या वर्षीची आसामची सर्वात महाग चहा पावडर ठरली आहे.

या मनोहारी गोल्ड टी चहा पावडरचे उत्पादन घेणाऱ्यांचे म्हणणे आहे कि या चहा पावडरचे या वर्षी फक्त २.५ किलो उत्पादन झालेले आहे. त्यापैकी १.२ किलो चहापावडरचा लिलाव करण्यात आलेला आहे. या चहा पावडरचे उत्पादन खूप कमी प्रमाणावर होत असते.

मनोहर टी स्टेटचे डायरेक्टर राजन लोहिया यांनी सांगितले कि, हि एक विशेष पद्धतीची चहा पावडर आहे. या चहाच्या पानांना सकाळी ४ ते ६ वाजेमध्ये सूर्याची किरणे पडायच्या आत तोडावे लागते. या चहाचा रंग हा मातीसारखा पिवळटसर असतो. तसेच हि चहापावडर आपल्या विशेष सुगंधामुळेही प्रसिद्ध आहे.

आसाम मध्ये या चहा पावडरची शेती ३० एकरांवर केली जाते. या चहाच्या पानांबरोबर कळ्यांनाही तोडले जाते. त्यानंतर यावर फरमेंटेशनची प्रक्रिया केली जाते. हि प्रक्रिया केल्यानंतर या हिरव्या पानांचा रंग बदलून राखाडी होतो. त्यानंतर या चहा पावडरला कडक उन्हात सुकवतात जेणेकरून तिचा रंग सोनेरी होतो.

एका रिपोर्टनुसार आसाममधील चहाचा उद्योग कोरोनामुळे सध्या एक हजार करोड रुपयांच्या तोट्यात आहे.  याचा परिणाम आसाममधील चहाच्या माळ्यावर झालेला दिसत आहे. परंतु एवढ्यातच मनोहारी गोल्ड टी ला मिळालेल्या प्रचंड भावामुळे या उद्योगाला एक नवी आस मिळालेली आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker