Marathi

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टी करणार ‘या’ क्रिकेटर सोबत करणार लग्न?

बाहुबली सिनेमातून फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आणि जगात ओळखली गेलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सुरुवातीला तिचं नाव बाहुबलीतील को-स्टार प्रभासशी जोडण्यात आलं होतं. मात्र या दोघांनीही या चर्चा अफवा असल्याचं म्हणत रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाकारलं. आता अनुष्काच्या लग्नाविषयीची जोरदार चर्चा असून ती एका क्रिकेटरशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Loading...

असं असलं तरी प्रभासने २०१९ मध्ये कॉफी विथ करणमध्ये दोघांमध्ये काहीही नसल्याचं स्पष्ट केलं. पण आता अनुष्काचं नाव एका नावाजलेल्या भारतीय क्रिकेटपटूशी जोडण्यात येत आहे. एवढंच नाही तर दोघं लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

हा क्रिकेटर दक्षिणेचा नसून उत्तर भारतातला असल्याचं कळतंय. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे लग्नाचीही तयारी जोरदार सुरु असल्याचं समजतंय. मात्र अद्याप अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा क्रिकेटर नेमका कोण असेल याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात आहेत.

Loading...

सध्या अनुष्का तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ती लवकरच निशब्धम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आर. माधवन दिसणार आहे. हा एक सायलेन्ट थ्रिलर सिनेमा असणार आहे.

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी चर्चांना नाकारल्यानंतर प्रभासचं नाव दुसऱ्या अभिनेत्रीशी जोडलं गेलं. आता अनुष्काच्या लग्नाविषयी या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे तिच स्पष्ट करू शकेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Loading...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close