Marathi

एकेकाळी लोकांच्या गाड्या धुणारा आज आहे 30 पेक्षा जास्त हॉटेलांचा मालक ! मराठी माणसाचा थक्क करणारा प्रवास !

हि गोष्ट आहे शैलेश जोशी यांची. शैलेश यांची आर्थिक परिस्थिती फारच कठीण होती. वडील एकटेच कमावणारे, त्यामुळे त्याचं लहानपण कष्टातच गेलं होतं. त्यांना कष्टाची सवयच होती. अगदी आठवी-नववीत असताना ते आणि त्यांचा भाऊ माउली बसस्टॉपवर काकडी आणि गजरे विकून पैसे मिळवत असे. प्रत्येक दिवाळी इतर मुलांसाठी आनंदाची असे, पण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पैसे मिळवणे हाच उद्देश असे. ते दिवाळीत फटाके विकायचे आणि सोबत किल्ल्यावरील पोस्टकार्डची घरे तयार करून ती पाच-पाच पैशांना विकायचे.

joshi wadewale

 

शाळा तर अशी कष्ट करतच गेली, पण पुढचं शिक्षण घेता यावं, कॉलेजमध्ये जाता यावं म्हणून ते रोज सकाळी साडेपाच ते साडेाठ या वेळात गाडय़ा धुण्याचे कामही करायचे. एक गाडी महिनाभर धुतल्यानंतर त्यांना त्याचे वीस रुपये मिळायचे. जास्त पैसे मिळावेत म्हणून ते सात सात, कधी जास्त गाडय़ाही धुवायचे. पण तेव्हापासून त्यांनी आपल्याकडेही गाडी असणारच हे स्वप्न पाहिलं होतं. ते सत्यात आणण्यासाठी ते जिवापाड मेहनत घेत होते.

joshi wadewale

बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला असताना कर्नाळय़ाच्या सहलीला शैलेश यांची मंदा यांच्याबरोबर पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत आणि मैत्रीचं पुढे प्रेमात कधी रूपांतर झालं.आम्ही दोघं प्रेमात पडलो खरे, पण दोघांच्याही घरची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी वेगवेगळी असल्याने दोन्हीही घरांतून लग्नाला विरोध झाला. लग्न करून संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच काहीतरी उद्योग करून आर्थिक बाजू सांभाळता यावी या हेतूने शैलशने झेरॉक्सचा व्यवसाय सुरू केला. २६ डिसेंबर १९८५ ला कोर्टात लग्न करून त्यांनी अक्षरश: फक्त अंगावरच्या कपडय़ांनिशी एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. नंतर त्यांची झेरॉक्सचा व्यवसाय सुरु केला. खेळ हा त्यांच्या खूप आवडीचा विषय होता. शाळेत असताना ते प्रत्येक खेळात भाग घ्यायचे आणि जिंकायचे. त्यातूनच त्यांना ज्यूदोचे वेड लागले त्यानेच त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले. पुढे त्यांनी ब्लॅक बेल्ट देखील जिंकला.

joshi wadewale

नंतर पुण्याच्या सारसबाग येथे भरलेल्या डिस्नेलँडमध्ये त्यांनी खाद्यपदार्थाचा स्टॉल टाकला. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की खाद्यपदार्थाचंच दुकान सुरू करायचं त्यांनी ठरवलं. पूर्वीच्या झेरॉक्सच्या दुकानाशेजारीच ‘विकीज स्नॅक्स सेंटर’ नावाने एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. काही दिवस सारसबागेत खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला. स्वारगेटजवळ डोशाची गाडी चालवली; पण या स्नॅक्स सेंटरच्या कारभारात म्हणावा तसा जम बसत नव्हता.

joshi wadewale

तेव्हाच त्यांचा डोक्यात वडापावचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. २ ऑक्टोबर १९८९ ला विकीज स्नॅक्स सेंटरच्या जागी ‘जोशी वडेवाले’ नावाने वडापावविक्रीचा श्रीगणेशा केला, आणि अक्षरश: पहिल्या दिवसापासूनच या उद्योगाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, ग्राहकांना आपलंसं करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आम्ही लवकरच पुणेकरांची मनं जिंकली.

joshi wadewale

एकापाठोपाठ एक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं, पण याच काळात शाळेच्या ट्रिपसाठी गेलेला त्यांचा मुलगा विकी एका भीषण अपघातात त्यांना कायमचा सोडून गेला. विकीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्याने सगळय़ाच गोष्टींतून त्यांचं मन उडालं. व्यवसायातही रस वाटेनासा झाला. दरम्यानच्या काळात त्यांचं व्यवसायात काहीसं दुर्लक्ष झालं होतं ते पुन्हा त्यांनी एकाग्र केलं.

joshi wadewale

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ‘जोशी वडेवाले’ हे क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनलं. त्यांच्या  इतर शाखाही सुरू झाल्या. जसजशी प्रगती होत गेली तसं त्यांनी स्वत:चं घर, पहिली गाडी घेतली. एक काळ असा होता जेव्हा शैलेश हे कुणीच नव्हते. फक्त आणि फक्त कष्टच त्यांच्या नशिबी होते. गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारे शैलेश आज ३० पेक्षा जास्त हॉटेलांचा मालक झाले आहेत. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कामविणारे शैलेश आज करोडपती झाले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker