Marathi

आशिकी चित्रपटातील या अभिनेताला ओळखणे देखील झाले कठीण.. पहा कसा दिसतो.

राहुल रॉय हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहे. नव्वदच्या दशकातील हा सुप्रसिद्ध अभिनेता आज कालांतराने कुठेतरी मागे पडल्यासारखं जाणवत आहे. नव्वदीच्या दशकात राहुल रॉय तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. कित्येक तरुणी याच्या वरती आपले प्राण ओवाळून टाकत असत, परंतु आज त्याची लोकप्रियता कमी झालेली आहे. या अभिनेत्याचा आपल्या सर्वांनाच विसर पडलेला आहे. राहुल रॉय परत चर्चेत आला तो करीना मुळे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात…..

डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात करीना सध्या परीक्षकाची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी कोणीतरी करीनाला तिचा पहिला क्रश कोण आहे याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा करीनाने कसलाही विचार न करता सांगितले की, तिचा पहिला क्रश दुसरा कुठलाही अभिनेता नसून तो राहुल रॉय आहे. केवळ त्याच्यासाठी तिने आशिकी चित्रपट तब्बल आठ वेळा पाहिलेला आहे. करीनाने केलेल्या खुलासा नंतर राहुल रॉयने इंस्टाग्राम वर एक पोस्ट लिहित करीनाच्या या कमेंट वर काय बोलावे हेच मला सुचत नाही असे म्हटले आहे.

राहुल रॉय एकेकाळचा सुपरस्टार असला तरी आज मात्र तो चित्रपट सृष्टी पासून प्रचंड दूर गेलेला आहे. आशिकी हा राहुल रॉयचा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिस वर ती प्रचंड धुमाकूळ घातला होता. आशिकी या चित्रपटाला आज अनेक वर्ष उलटली आहेत. तरीही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभर देखील कमी झालेली नाही.

राहुल रॉय ने अनेक चित्रपट केले. त्यापैकी त्याने साकारलेल्या जुनून, गुमराह मधील भूमिका प्रचंड गाजल्या. तो काही वर्षांपूर्वी बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याने मिळवले आहे.

राहुल काही दिवसांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आला होता. त्याचे लग्न राजलक्ष्मी खानविलकर ह्या मॉडेलसोबत झाले होते, परंतु दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट देखील झाला. या घटस्फोटानंतर तो साधना सिंग या मॉडेलला डेट करत असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker