Marathi

लक्ष्मी बॉम्ब रिलीज होणार नाही? अक्षय कुमारला बदलावे लागले आपल्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव ! हे होते कारण…

अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब चे नाव बदलण्यात आले आहे. लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलून केवळ लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट खूप साऱ्या हॉरर कॉमेडीने भरलेला आहे. चित्रपट रिलीस होण्याच्या अगदी काही दिवस आधी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अक्षय कुमार आणि किनारा अडवाणी यांनी या चित्रपटात मुख्य अभिनेता-अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या चाहत्यांना खूप दिवसांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती, परंतु कॉरोनकाळातील लाकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता. अजूनही या चित्रपटाच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

करणी सेनेने पाठविलेल्या कायदेशीर नोटिसीमुळे व प्रेक्षकांच्या विरोधामुळे निर्मात्यांना या चित्रपटाचे नाव बदलावे लागले. त्यामुळे चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब ऐवजी लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत सेंसर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केल्या गेलेल्या स्क्रिनिंगच्या वेळी सेंसर बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

मागील गुरुवारी करणी सेनेने एक कायदेशीर नोटीस पाठवून या चित्रपटाचे नाव बदलण्यास सांगितले होते. करणी सेनेने या नोटीसमध्ये हिंदू समुदायाद्वारा सांगितले होते कि या चित्रपटाचे नाव देवी लक्ष्मीचा अपमान करणारे आहे.

नोटीसमध्ये हे सुध्या सांगितले होते कि, निर्मात्यांनी मुद्दाम अपमान करण्यासाठी देवी लक्ष्मी यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. तसेच हे नाव लोकांच्या धार्मिक भावनादेखील दुखावत आहे.

नेटकऱ्यांनी आणि करणी सेनेने आवाज उठविण्याबरोबरच शक्तिमान मधील अभिनेता मुकेश खन्ना यांनीदेखील या नावाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांचे म्हणणे होते कि हे नाव निर्मात्यांनी त्यांचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी दिलेले आहे.

आता लक्ष्मी चित्रपट हा ९ नोव्हेंबर रोजी डिजनी + हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार हा एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker