Marathi

महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांची नातं करतेय बॉलिवूड मध्ये एन्ट्री !

बॉलिवूडचा फ्रँक स्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच रितेश देशमुख हा होय. तो अगदी कमी वेळात फार कमी चित्रपट करून देशात स्वतःचा एक आगळावेगळा चाहतावर्ग तयार केला. स्वतःच्या जिद्दीने चिकाटीने तो बॉलीवूड पर्यंत पोहोचला पण त्याला ट्रोल केलं गेलं कारण तो माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा होता म्हणून पण तो सगळ्या गोष्टींना धुडकावत आपल्या टॅलेंटने मोठे नाव केले.

रितेश देशमुख प्रमाणेच महाराष्ट्राचा राजकीय घराण्यातील एक मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. तिचे नाव शर्वरी वाघ असे असून ती माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. सध्या चर्चेत असलेला द ‘फोरगॉटन आर्मी ‘ या वेबसिरीमध्ये ती झळकली आहे. ती देखील रितेश प्रमाणे कमी वेळात नाव कमवत आहे. ॲमेझॉन प्राईम वर तिची हि वेब सिरीज मधील सौंदर्याची दखल तसेच कौतुक सर्वत्र होत आहे.

या वेबसिरीज चे दिग्दर्शक प्रसिद्ध लेखक/ दिग्दर्शक कबीर सिंग याने केले आहे. शर्वरी सोबत सनी कौशल देखील सहकलाकार म्हणून दिसून येत आहे.ती लवकरच सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत “बंटी और बबली 2″या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.
मराठी मातीचा अटकेपार झेंडा बॉलीवूड मध्ये घट्ट रोवेल हे नक्कीच शर्वरीला पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close