Marathi

साऊथ चित्रपटातील हा सुप्रसिद्ध अभिनेता आहे महाराष्ट्राचा जावई !

महेश बाबू हे नाव अख्ख्या भारतात कोणाला माहित नाही असं होवूच शकत नाही. तो दाक्षिणात्य चित्रपटातला सर्वाधिक लोकप्रिय तसेच सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून परिचित आहे. आपल्या जबरदस्त स्टंट आणि अभिनयामुळे त्याने भारतात एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात थलैवा म्हणजेच रजनीकांत, नागार्जून, चिरंजीवी, अल्लू अर्जुन सारख्या सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीत प्रमुख नाव महेश बाबूचेही आहे. परंतू महेश बाबूच्या वैयक्तिक जीवना विषयी फार कमी लोकांना माहित असेल. चला तर मग जाणून घेवू महेश बाबू आणि मराठमोळ्या नम्रता शिरोडकरची अनोखी प्रेम कहाणी विषयी.

बाॅलीवूड मध्ये एका पेक्षा एक चित्रपट केल्या नंतर नम्रताला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांचे रांगा लागू लागल्या. म्हणून तिने बाॅलीवूड मधला ‘जब प्यार किसी से होता है’ हा चित्रपट गाजवून साऊथ कडे वळाली आणि तिने ‘वामसी’ हा चित्रपट साईन केला. या चित्रपटात प्रमुख भुमीकेत महेश बाबू होता.

त्यावेळी महेश बाबूला नम्रता येवढी लोकप्रियता नव्हती. पण महेश बाबू नम्रताला पाहता क्षणी प्रेमात पडला. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्याने तिला प्रपोज केले. पण शेवटी नम्रताने अनेक दिवसांचा वेळ घेवून तिने त्याला होकार दिला. मात्र ही गोष्ट त्या दोघांनी कोणालाच सांगितली नव्हती. एकमेकांच्या घरात देखील. त्यानंतर सलग तीन वर्ष एकमेकांना डेट केल्या नंतर त्यांनी आपलं नात जाहीर केले आणि 10 फेब्रुवारी 2005 साली लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे या दोघांनीही प्रेम आजतागायत तसच टिकवून ठेवलं आहे. महेश बाबू नम्रता शिरोडकरशी लग्न केल्या नंतर दाक्षिणात्य चित्रपटातला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला. पण नम्रताने चित्रपटातून कायमची विश्रांती घेतली. पंधरा वर्षां नंतरही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हिच लाख मोलाची गोष्ट आहे.

त्यांना गौतम आणि सितारा ही दोन मुलं असून लवकरच आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय करताना नक्की दिसतील. विशेष म्हणजे फार कमी लोकांना माहित आहे की नम्रता महेश बाबू पेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. असो या हसत्या खेळत्या कुटुंबाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker