Health

मेकअप मुळे जाऊ शकतो तुमचा जीव किंवा होऊ शकतो हा भयंकर रोग !

आजकाल मेकअप ही बर्याच महिलांची गरज बनली आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की कमीतकमी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांशिवाय त्या घराबाहेर पडूच शकत नाहीत. सौंदर्यप्रसाधनांचे बाजारपेठ इतक्या प्रमाणात फुललेली आहे की शरीराच्या प्रत्येक भागासाठी व वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का ही सौंदर्यप्रसाधने तुमच्या जीवावर बेतू शकतात.

कॅन्सर : सौंदर्यप्रसाधनांच्या अत्यधिक वापराचा सर्वात धोकादायक दुष्परिणाम म्हणजे त्वचा कर्करोग. लिपस्टिकमध्ये ऍल्युमिनियम असते ज्यामुळे ऍनिमिया आणि ग्लूकोज इंटोलरन्स देखील होऊ शकते. बर्याच उत्पादनांमध्ये झिंक ऑक्साईड आणि बेरियम सल्फेट सारखी रसायने असतात जी विषारी असतात ज्यामुळे अवयव निकामी होऊ शकतात, विशेषत: मूत्रपिंड आणि यकृत. शरीरातील मॉइश्चरायझर्स सारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे शरीरातील थायरॉईड ग्रंथीमध्ये त्रास होऊ शकतो. सौंदर्यप्रसाधने जास्त काळ टिकावी म्हणून त्यात पेराबेन्स नावाचे रसायन वापरले जाते. हे त्वचेच्या कॅन्सरसाठी मुख्य कारण आहे.

फुफ्फुसाचे आजार : सुगंधी किंवा पावडर सौंदर्यप्रसाधनांमध्ये रसायनांचा वापर केला जातो, ह्या रसायनांमुळे फुफ्फुसाचे नुकसान होऊ शकते. टाल्कम पावडरमधील रासायनिक घटक जसे कि सिलिकेट्स टॅल्क फुफ्फुसातील ऍलर्जी आणि संसर्गास कारणीभूत ठरतात. पावडरवर आधारित सौंदर्यप्रसाधने वापरताना श्वास घेतला जातो तेव्हा ती फुफ्फुसात राहू शकतात व शरीरभर पसरू शकतात, ज्यामुळे अनावश्यक नुकसान होऊ शकते.

वंध्यत्व : बबल बाथ किंवा तेल यासारख्या विशिष्ट सौंदर्यप्रसाधनांमुळे आपल्या प्रजनन अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि वंध्यत्व देखील उद्भवू शकते. टॅल्कम पावडर, श्वासावाटे शरीरात गेल्यास ते प्रजनन प्रणालीपर्यंत जाऊ शकते आणि मासिक पाळीव व इतर असंतुलन निर्माण करू शकते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या अशा फिथलेट्स आणि पॅराबेन्समुळे प्रजनन हार्मोन्समध्ये अडथळा येऊ शकतो आणि रिप्रोडकटीव्ह आणि थायरॉईड सिस्टमला धोका निर्माण होऊ शकते. शॉवर जेल सारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे आपल्या अवयवांशी थेट संपर्क साधल्यास आणि ते खराब गुणवत्तेचे असल्यास योनिमार्गाच्या संसर्गास किंवा प्रोस्टेट आणि ओव्हरीयन कॅन्सर देखील होऊ शकते.

ह्याशिवायच डोकेदुखी, केस गळती, पॉइजनिंग, अकाली वृद्धत्व ह्यांसारख्या समस्या देखील निर्माण होतात.

Credit -भक्ती संदिप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker