News

मानसी नाईक पडलीय प्रेमात, पहा कोण आहे तिचा प्रियकर आणि तो काय करतो ?

घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या हालचालीवर आपल्या मराठी सिने रसिकांचं लक्ष नेहमीच असतं. मग अशा लहान-मोठ्या घडामोडी आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो, तुम्हाला मराठी तसेच बॉलीवूड मधील घडामोडींविषयी माहिती मिळत राहील. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशाच एका मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री बद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आम्ही तुमच्यासाठी मानसी नाईक चा प्रियकर कोण आहे याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात……

Loading...

Loading...

ईटीव्हीमराठीच्या चार दिवस सासूचे या सुप्रसिद्ध मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच मानसी नाईक. मानसी तिच्या नृत्यामुळे देखील प्रचंड प्रसिद्ध आहे. आजच्या तरुणाईने तर तिला अगदी डोक्यावर घेतलेलं आहे‌. प्रत्येक मिरवणुकीत मानसी नाईक चं गाणं वाजणारच‌.

2 फेब्रुवारी मानसी नाईकचा वाढदिवस असतो या वाढदिवसाचं औचित्य साधून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो दुसर्‍या कुणाचा नसून तिचा आणि तिच्या प्रियकराचा आहे. हा फोटो शेअर करत तिने आपल्या नात्याची कबुली दिली आहे. या फोटोमध्ये जो दिसत आहे तो आहे प्रदीप खरेरा मानसी नाईकचा बॉयफ्रेंड.

प्रदीप एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने हा फोटो शेअर करत प्रदीप ला तिच्या आयुष्यात आल्याबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. प्रदीप ने देखील हाच फोटो शेअर करत मानसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केलेला आहे.मानसी नाईक हिने आत्तापर्यंत मराठी सिनेसृष्टी मध्ये प्रचंड काम केलेलं आहे‌‌.

मानसी नाईक आइटम सॉन्ग आणि लावणी साठी देखील प्रसिद्ध आहे. तिने केलेली रिक्षावाला, बाई वाड्यावर या ही गाणी आज देखील तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहेत. तिने यासोबतच जबरदस्त, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारलेली आहे. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटलं हे आम्हाला नक्की कळवा.

Loading...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close