अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाआधी दिलेल्या बॅचलर पार्टीचे फोटो झाले तुफान व्हायरल ! फोटोस पाहून थक्क व्हाल !

लॉकडाऊन मध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्रींचे लग्न पार पडले आहे. या नंतर आता लवकरच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक विवाहबंधनात अडकणार आहे. मानसी नाईक तिच्या बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत गेले अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होती.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मानसीने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला आणि आता लग्नाची तारीख देखील ठरली आहे. मानसी नाईक एक उत्तम नृत्यांगना तसेच एक उत्तम अभिनेत्री आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. हे दोघेही थोड्याच दिवसात विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या आधी मानसीने दिलेल्या बॅचलर पार्टीचे फोटोस हे खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या मैत्रिणींसाठी खास बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. मानसी नाईकने सोशल मीडियावर तिच्या पार्टीचे काही खास फोटो शेअर केले आहे आणि तिने म्हटले आहे मी माझ्या बहिणींशिवाय प्रदीपसोबत लग्न करू शकत नाही.
मानसी नाईक तिच्या बॉयफ्रेंड सोबत 19 जानेवारी रोजी लग्न करणार आहे. सोशल मीडियाद्वारे मानसीने तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाची तयारी करत असल्याचा तिच्या चाहत्यांना खूप आनंद झालेला आहे.
मानसीच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व पोस्टवर एक कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही कमेंट दुसरी कुणाची नसून तिचा होणारा नवरा प्रदीपची आहे. प्रदीपने लिहिले आहे की माझी लाडू रानी तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो .
मानसी नाईकने आपल्या डान्सने हॅलो बोल, मराठी तारक, ढोलकीच्या तालावर यांसह अनेक मराठी माध्यमातून आपला जलवादाखवला आहे. मानसी नाईकने पडद्यावरही आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.