Marathi

तुम्हाला माहित आहे का या ठिकाणी सामूहिक आत्महत्या होतात ! आत्महत्येमागील कारण काय?

सहसा माणूस मरतो. फार फार तर जर जीवणाला कंटाळला किंवा त्याला जगणं नकोसं झालं तर तो स्व- इच्छा मरणाचा मार्ग निवडतो म्हणजेच थेट आत्महत्या. पण सामुहिक आत्महत्या हा प्रकार आपण खचितच ऐकला असेल. पण यात अजून महत्वाची भर टाकायची म्हटलीच तर ती आहे, पक्ष्यांच्या सामुहिक आत्महत्येपाठी नेमकं काय कारण असेल? ही गोष्ट जाणून घेणं. मुळात पक्षी आत्महत्या करतात याच थोडसं ज्ञान आपल्याला कबुतर या पक्ष्यांच्या अभ्यासातून लक्षात येतं.

कबुतर हा पक्षी जेव्हा कुठे कधी त्याला त्याचा जीव धोक्यात आहे असं भासायला लागतं तेव्हा तो लागलीच आपला जीव सोडतो. तर एक गुपीत रहस्य असचं भारतात सध्या चर्चेत येतयं ते म्हणजे, आसाममधील जतिंगा गाव. हे गाव चर्चेत यायचं मुळ कारण म्हणजे इथे पक्षी कळपाच्या जमावाने एकत्र येऊन आत्महत्या करतात, थोडक्यात काय तर सामुहिक आत्महत्याच! पण आजवर या बाबीचा उलगडा अनेक खग़ तज्ञ (पक्षीशास्त्रज्ञ) देखील करू शकले नाहीत.

नेमक या ठिकाणीच असं काय आहे ज्यामुळे पक्षी जमावाने एकत्र जमून आत्महत्या करतात. आणि ठराविक वेळीच का इथे आकाशात काही चित्रविचित्र घटना घडत राहतात.  मुळात जतिंगा गाव हे आसाममध्ये वसलेले एक छोटेसेच गाव आहे. सध्या पक्ष्यांच्या आत्महत्येच्या घटनांसाठी हे अफाट चर्चेत आले आहे. असे म्हणतात की, येथे पक्षी येऊन आत्महत्या करतात. जपानच्या माउंट फुजी तलावातील ओकिगाराच्या घनदाट जंगलात लोक ज्या प्रकारे आत्महत्या करण्यास येतात;

त्याचप्रमाणे मान्सूनच्या अवजड रात्री मृत्यूच्या काळ्या छाया जतिंगाच्या आकाशात फिरत असल्याचे दिसते. उजेडापर्यंत, कळपाचे कळप जमिनीवर पडून जातात आणि काळाच्या आड विलीन होतात. याआधी दखल घेण्याजोगी बाब घडलेली ती एकदा येथे चिमण्यांनी सामुहिक आत्महत्या केलेली तेव्हा. चिमण्यांच्या या सामूहिक आत्महत्येमागील कारण काय? हे आजपर्यंत कळू शकले नाही. हे शोधण्यासाठी बरेच संशोधन केले गेले; परंतु निसर्गाच्या या गूढ रहस्येविषयी ठोसपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. आसामच्या काचर भागात वसलेल्या या दरीची रहस्ये जाणून घेणे अशात महत्वाचे ठरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker