Health

आपल्या दातांची व तोंडाची काळजी कशी घ्याल ?

‘हसतील त्याचे दात दिसतील’ अशी एक फार प्रचलित म्हण आपल्याकडे आहे. इतर अवयवांप्रमाणेच दातांची आणि तोंडाची काळजी घेणे आवश्यक आहे. वर्षातून किमान 4 वेळेला तरी डेंटिस्टला दाखवून आपल्या दातांची आणि तोंडाची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे ते शक्य होत नाही. तेव्हा तुम्ही स्वतःदेखील काही सोप्या गोष्टी करून तुमच्या तोंडाची व्यवस्थित काळजी घेऊ शकता.

बर्याच नैसर्गिक उपायांमुळे आपणास निरोगी हिरड्या मिळण्यास मदत होते, जे आपल्या संपूर्ण आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. नियमित दोनवेळा ब्रश करणे, जेवणानंतर व्यवस्थित गुळणा करणे ह्यामुळे उत्तम दात आणि हिरड्या मिळण्यास मदत होते.

चीझ आणि पनीर वर दिलेल्या दोन गोष्टींचे आपण चाहते असाल तर आता आपल्याकडे या चवदार अन्नाचा आनंद घेण्याचे आणखी एक कारण आहे. 2013 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की हे पदार्थ खाल्ल्याने तोंडातील पीएच वाढते तसेच दात खराब होण्याचा धोका कमी झालेला ही दिसून आला आहे. चीझ मध्ये प्रोटीन, कॅल्शियम सारखी पोषकतत्वे असतात जे टूथ इनामल मजबूत करण्यास मदत करतात. लॅक्टिक इंटोलरन्स असणाऱ्या व्यक्तींनी मात्र ह्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

दही चीज प्रमाणे दहीमध्येही कॅल्शियम आणि प्रोटिन्स जास्त प्रमाणात असतात, यामुळे आपल्या दातांची ताकद आणि आरोग्या वाढवण्यासाठी दही एक चांगली निवड आहे. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स अर्थात फायदेशीर बॅक्टेरिया तुमच्या हिरड्यांना फायदा करतात कारण हे चांगले बॅक्टेरिया कॅव्हिटी निर्माण करणार्या बॅक्टेरियांना कमी करतात.

पालेभाज्या सर्वांना नको वाटणाऱ्या ह्या पालेभाज्या खरंतर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, फॉलिक ऍसिड आणि दात आणि हिरड्यांसाठी बरीच महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कोशिंबीरी आणि सँडविचमध्ये कुरकुरीत ताज्या हिरव्या भाज्या दात स्वच्छ करण्यास देखील मदत करतात.

तंतुमय (फायबर्स) पदार्थ ऊस, गाजर, सफरचंद ह्यांसारखी फळे तंतुमय असतात. ही फळे तोंडात खाताना लाळ निर्माण करून कॅव्हिटी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला कमी करण्यास मदत करतात.

सुकामेवा सुकामेवा आपल्या दातांसाठी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे असंख्य महत्त्वपूर्ण घटक आहेत. बदाम, काजू, शेंगदाणे आणि आक्रोड हे विशेषतः फायदेशीर आहेत जे दात किडण्यासाठी कारणीभूत बॅक्टेरियांशी लढण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, शेंगदाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे आणि बदामांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे दात आणि हिरड्यासाठी फायदेशीर आहे. काजू लाळ उत्तेजित करण्यासाठी ओळखले जातात आणि अक्रोडमध्ये फायबर, फॉलिक ऍसिड, लोह, थायमिन, मॅग्नेशियम, लोह, नियासिन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि झिंक सर्वकाही असते.

कांदा-लसूण तोंडाच्या दुर्गंधीमुळे कांदा आणि लसूण बरेच लोक टाळतात पण ह्यात असणारे अँटी-बॅक्टेरीयल गुण दात किडणे, हिरड्यांचे आजार, कॅव्हिटी कमी करण्यास मदत करतात.

ह्याशिवाय स्ट्राबेरी, किवी, होल ग्रेन्स देखील तोंडाच्या उत्तम आरोग्यासाठी मदत करतात.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker