Health

सारखं सारखं तोंड / तोंडातलं येतंय तर करा हे सोप्पे उपाय !

तोंड येणे किंवा तोंडातले येणे ही अगदीच सामान्य समस्या आहे. ह्यामागचे नक्की कारण माहिती नसले तरी अन्न चावताना गाल किंवा जीभ दाताखाली आल्याने, व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे किंवा खूप तिखट व तेलकट पदार्थ खाल्ल्याने तोंड येते. तुमच्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी तुम्हाला तोंड आल्यावर त्याच्या वेदनांपासून आराम देऊ शकतात.

ऍपल सिडर व्हिनेगर : ऍपल सिडर व्हिनेगरमधील ऍसिडिटी अल्सरसाठी कारणीभूत जीवाणू नष्ट करू शकते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिक्स करावे. दोन मिनिटांसाठी आपल्या तोंडात ठेवा आणि नियमित पाण्याने आपले तोंड स्वच्छ धुवा. दिवसातून दोनदा सूज कमी होईपर्यंत असे करा.

लवंग : लवंगा बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ओळखले जातात – तज्ञ म्हणतात की लवंगामुळे पोटातील अल्सर कमी होण्यासही मदत होते. लवंगाचा एक तुकडा तोंडात ठेवावा. लवंगाच्या कळ्या चघळल्याने आराम मिळतो.

मध : मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच हे एका चांगल्या नैसर्गिक मलमसारखे काम करते. तोंड आल्यास थोडा कापूस घ्या आणि कापसाच्या मदतीने अल्सरवर मध लावा. सूज आणि वेदना कमी होईपर्यंत हे करत रहा.

कोरफड : विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण कोरफडीच्या असंख्य उपयोगांपैकी हा एक उपयोग आहे. तोंड आल्यावर कोरफडीचा रस तोंड आले तिथे लावा. कोरफडच्या एंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे ह्यापासून आराम मिळण्यास मदत होईल.

मीठ : एका ग्लास कोमट पाण्यात थोडेसे मीठ घाला आणि त्याच्या गुळण्या करा. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून शक्य तितक्या वेळा प्रयत्न करा. खारट पाणी तोंडाच्या अल्सर उद्भवणार्या जंतू आणि बॅक्टेरियांच्या विरूद्ध खरोखरच प्रभावी ठरू शकते.

भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker