Marathi

नमक हलाल चित्रपटातील त्या एका सीन मुळं रात्रभर रडत होती ही अभिनेत्री !

बॉलीवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. ज्यांनी बॉलीवूडच नाव उंचावलं आहे. जर आपण बॉलिवूडचा विचार केला तर अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड महानायक असे संबोधले जाते. या महानायकाबद्दल तुम्ही अनेक किस्से नक्कीच ऐकले असतील. यातीलच एक किस्सा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी एका चित्रपटासाठी एक गाणं शूट केलं होतं परंतु त्यानंतर त्या चित्रपटाची सहकलाकार अभिनेत्री स्मिता पाटील रात्रभर रडत होती. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन आपल्या दमदार एक्टिंग आणि भारदस्त डायलॉगसाठी प्रसिद्ध आहेत, तर स्मिता पाटील यांनीदेखील एक काळ गाजवला होता. त्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. स्मिता पाटील यांचा एक फार मोठा प्रेक्षकवर्ग देखील होता.

हे दोघेही नमक हलाल या चित्रपटासाठी एक गाणं शूट करत होते. या गाण्यामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांना अनेक इंटीमेट सीन द्यावे लागले, ज्यामुळे गाणं पूर्ण झाल्यानंतर स्मिता पाटील यांना खूप वाईट वाटत होतं. त्या गाणं पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रात्र रडत होत्या. जेव्हा अमिताभ बच्चन यांना कळलं की त्या गाण्याच्या शूटिंग नंतर स्मिता पाटील यांना वाईट वाटले तेव्हा त्यांनी स्मिता पाटील यांना समजून सांगितले की हे गाणं स्क्रिप्ट मध्ये होतं म्हणून करावं लागलं.

एवढं वाईट वाटून घेऊ नये. अमिताभ यांनी समजावल्यानंतर स्मिता पाटील त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि त्यांनी पुढे शूटिंग सुरु ठेवली. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. आज देखील जर कोणी जुनी फेमस गाणी काढली तर त्यामध्ये हे गाणं नक्कीच सापडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker