Marathi

डाॅ.निलेश साबळे यांचा प्रेरणादायी असा जिवनप्रवास, नक्की वाचा!

डाॅ. निलेन साबळे एक उत्कृष्ठ निवेदक,लेखक अभिनेता,दिग्दर्शक म्हणून माहित आहे परंतू त्याचा जिवन प्रवास फार कमीच लोकांना माहित असावा. निलेश साबळेचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे 30 जुन 1986 रोजी झाला. निलेशला सुरूवाती पासूनच अभिनयाची आणि निवेदनाची प्रछंड आवड होती. तो शाळा-काॅलेजात असल्यापासूनच कलाकारांची मिमीक्री करण्यामुळे ओळखला जावू लगला. परंतू वडिलांच्या इच्छेमुळे तो वैद्यकिय शिक्षण घेवू लागला.

वडिलांना शिकून डाॅक्टर व्हायचे होते परंतू त्यांना परिस्थिती मुळे वैद्यकिय शिक्षण घेता आले नाही. म्हणून निलेशने वैद्यकिय शिक्षण घ्यायचे ठरविले. आणि तो वैद्यकिय शिक्षण घेत असतानाच एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. आणि त्याच्या जिवनातील प्रेम कहाणीला सुरूवात झाली.

वैद्यकिय शिक्षण पुर्ण होताच निलेश एका हाॅस्पिटल मद्ये डाॅक्टर म्हणून काम करू लागला. परंतू त्यात आपले मन लागत नसल्याने वडिलांना काही वर्षाची मुदत मागितली. आणि वडिलांनी देखील त्याच्यातल्या कलाकाराला कधी मारले नाही.

महाराष्ठ्राचा सुपरस्टार नावाच्या कार्यक्रमात तो घराघरात पहिल्यांदा पोहचला आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळू लागले. आपल्या बहुरूपी अभिनयाच्या अंगामुळे आणि विनोदातील हजरजबाबी स्वभावामुळे तो विनोदी अभिनेता,स्टँडअप काॅमेडीअन तसेच मिमेक्री आर्टीस्ट म्हणून ओळखला जावू लागला. तो महाराष्ठ्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा विजेताही झाला.

त्यानंतर तो फु बाई फु सारख्या प्रसिध्द कार्यक्रमाचा निवेदक म्हणून दिसू लागला. निवेदक तसेच लेखक म्हणून ओळखला जात असताना त्यात अधुन मधून आपल्या आतील कलाकाराला जागवणे थांबविले नाही. त्यानंतर त्याला खरी ओळख मिळाली ते चला हवा येवू द्या सारख्या विनोदी कार्यक्रमामुळे.

महाराष्ठ्रातला सर्वोत्कृष्ठ निवेदक तसेच लेखक,दिग्दर्शक म्हणूनही नावाला येत आपल्या यशाचे शिखर गाठत अथक प्रयत्ना नंतर आज तो यशस्वी बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker