News

वरून धवन म्हणतोय चित्रपटसृष्टीतील या 2 अभिनेत्रींशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.

आज आपण एक गोष्ट जाणून घेतोय ती म्हणजे, कोण आहेत त्या दोन अभिनेत्र्या ज्यांना तोड नाही असं चक्क वरूण धवन बोलत आहे. वरूण धवनची स्पेशल अशी ओळख सांगायची म्हटलं तर ती एक स्टारकीड यापेक्षा वावगी सांगता येत नाही. परंतु तसं असेल तरीदेखील स्वत:च एक आस्तित्व सिद्ध करायला तुम्हाला या क्षेत्रात कामातून, मेहनतीतून सिद्ध व्हावचं लागतं. असं नसतं तर मध्यंतरी वरूणचे बरेच चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत व इतर बाबीतही पडले नसते. आणि आता या सर्व अपयशांवर मात करत वरूण धवनने पुन्हा उभारी घेण्याची सुरूवात केलीये, असचं म्हणावं लागेल.

Nushrat Bharucha Latest Hot Photoshoot 2020

वरूण धवनच्या चित्रपटांतील काही भूमिकांनी जरी प्रेक्षकांना नाराज केलं असलं तरी पुन्हा नव्या जोमाने तो प्रेक्षकांना भुरळ घालायला सज्ज झालायं, होतोयं असचं म्हणा. वरुण धवनचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी मुंबई येथे झाला. २०११ सालच्या ‘देसी बॉईज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा दिग्दर्शक रोहित धवन हा वरुणचा मोठा भाऊ आहे. तो अभिनेता अनिल धवनचा पुतण्या आणि अभिनेता सिद्धार्थ धवनचा चुलत भाऊ आहे. त्यांनी यूकेच्या नॉटिंघॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. तर हे सगळं बाजूला ठेवून आता मुळ मुद्द्यावर येऊयात.

 

ते म्हणजे, वरूण धवनने त्या दोन अभिनेत्रींबद्दल काय मत मांडले?आज आपण बॉलिवूड हँडसम अभिनेता वरुण धवनबद्दल काही सांगणार आहोत, ज्याने दिग्दर्शक करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर”या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वरुण धवनने पदार्पणापासूनच अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु मध्यंतरी काही काळ त्याचे चित्रपट पाहिजे तशे यश मिळवू शकले नाहीत. अर्थातच त्याला वेगळी कारणे आहेत. सध्या नुकताच प्रदर्शित झालेला वरुण धवनचा चित्रपट “स्ट्रीट डान्सर 3D” बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे.

या चित्रपटानंतर वरुण धवन कुली नंबर वन या चित्रपटामध्ये दिसणार आहे. वरूणचे वडील “डेव्हिड धवन” दिग्दर्शित या चित्रपटात “सारा अली खान” मुख्य नायिका साकारणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान वरुण धवनला विचारले गेले, फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे? त्यावर वरुण धवन सांगितले की, दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. आणि मला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे. यानंतर त्यासोबतच वरुण धवन म्हणाला, “काजल अग्रवाल” हीदेखील उत्तम अभिनेत्री देखील आहे. आणि मला नक्कीच या दोन्ही अभिनेत्रींसोबत काम करायला आवडेल. पुढे वरुण धवन हेही म्हणाला की, चित्रपटसृष्टीतील या 2 अभिनेत्रींशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker