News

…नाहीतर माझा जीव सुद्धा गेला असता !

कसोटी जिंदगी की या मालिकेमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या एका अपघाताबद्दल माहिती दिली आहे. राजस्थान पत्रिकेचा रिपोर्टनुसार या अपघातामध्ये पूजाचा जीवदेखील जाऊ शकला असता. काय होता हा अपघात जाणून घेऊयात……

पूजा बॅनर्जी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. पूजाने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य प्रेक्षकांना दाखवले आहे. पाच महिन्यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये “नच बलिये” या रियालिटी शोच्या सेट वरती पूजा सोबत हा अपघात घडला होता. आजही या अपघाताच्या आठवणीने पूजाच्या अंगावरती शहारे येतात. याबाबत बोलताना पूजा म्हणाली,” मला आता वेदना होत नाहीत. परंतु छोट्या-मोठ्या हालचाली आज देखील मी करू शकत नाही. मी माझ्या उजव्या हाताचा उपयोग आजही करू शकत नाही. माझं हस्ताक्षरच बदलल आहे. मी अनेक गोष्टी उचलू देखील शकत नाही, कारण माझ्या हातात ताकदच राहिली नाहीये.

मी हातात अजुन ब्रश देखील पकडू शकत नाही. शूटिंग वर जाणं तर फारच दूरची गोष्ट राहिली. गेली काही महिने माझ्यासाठी खूप कठीण काळ राहिला आहे.” पूजा पुढे म्हणाली, ” मी स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले. मी इतक्या जोरात पडले होते की माझा जीव सुद्धा जाऊ शकत होता. मात्र मी यातून वाचले माझ्या चेहऱ्यावर आणि डोक्याला कोणतीच दुखापत झालेली नाही.

ज्यावेळी तुमच्या सोबत एखादी वाईट घटना घडते तेव्हा तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी चे मोल तुम्हाला कळते.” त्या अपघाताबाबत बोलताना पूजा अशा पद्धतीने व्यक्त झाली पूजाला झालेल्या या अपघातातून ते सहीसलामत बाहेर यावी आणि परत एकदा टीव्ही स्क्रीन वरती तिने प्रेक्षकांचे मनोरंजन करावे एवढीच सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker