Entertainment

महाराणी येसूबाईंचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीला मालिकेतून काढून टाकले ! कारण सांगताना रडू कोसळले !

गेल्या काही दिवसांपासून ‘आई माझी काळुबाई’ मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर चांगल्याच भडकलेल्या दिसत आहेत.

या मालिकेतून प्राजक्ता गायकवाडला काढण्यात आलं असून आता तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप हिला घेण्यात आलं आहे. प्राजक्ताच्या गैरवर्तणूकीमुळे तिला मालिकेतून काढूण टाकण्यात आलं आहे. हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नसून बऱ्याचदा प्राजक्ताला सांगूनही तिच्यात कोणताही बदल झाला नाही. यामुळे एवढ्या टोकाचा निर्णय घेण्यात आला.

प्राजक्ता गायकवाड मालिकेत आर्याची मुख्य भूमिका साकारत होती. मात्र ही भूमिका साकाररत असताना सेटवरील अनेकांना त्रासातून जावं लागत होतं. अलका कुबल यांच्या म्हणण्यानुसार, प्राजक्ता संपूर्ण युनिट तयार असताना तिचा सेट लागलेला असताना चार-चार कधी कधी तर सहा-सहा तास मेकअप रुममधून बाहेर यायची नाही.

डोकं दुखतं या कारणाने शुटिंग करायची नाही. अनेकदा परीक्षेचं कारण सांगून अचानक सुट्टी घ्यायची. सुपाऱ्यांच्या प्रोग्राममुळे अचानक शुटिंग रद्द करायची. मी काही वर्षांपूर्वी प्राजक्तासोबत काम केलं होतं. प्राजक्ताचं नाव मीच या मालिकेकरता सुचवलं होतं. पण ती तेव्हा अशी नव्हती. या बरोबर तिची आई सेटवर यायची आणि अभिनेत्रीची आई म्हणून त्यांचा एक वेगळाच रुबाब होता.

या सगळ्याला कंटाळून अनेकदा मालिकेच्या निर्मात्या, दिग्दर्शक, वाहिनीतील संबंधित लोकं या सगळ्यांनी प्राजक्ताला माहिती दिली. मात्र तिच्या वर्तणुकीत कोणताही बदल होत नसल्यामुळे तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मला मालिकेतून काढले नाही, मीच मालिका सोडली. तसेच मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली,’ असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड भावूक झाली आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील वाद संपायचं काही नावच घेत नाही. आज या मालिकेतील आर्या पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने पत्रकार परिषद घेतली. यामधून तिने आपली बाजू मांडली आहे.

मालिकेच्या सेटवर माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. तसेच सेटवर मला शिवीगाळ करण्यात आली. तुमच्या मुलींसोबत असे काही झाले असते तर अलका ताई अशाच वागल्या असता का? असा सवाल यावेळी प्राजक्ता गायकवाडने मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना केला आहे.

मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले नव्हते. माझ्यामुळे शूटिंग कधी थांबले नाही. मी इव्हेंट ची सुपारी घेते असा आरोप झाला त्यात तथ्य नाही. कारण सध्या कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत. तसेच मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. यावरून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत.

मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं. तसेच अलका ताई माझ्यासाठी आई सारख्या आहेत, मात्र त्या नराधमांना पाठीशी घालताहेत. माझी बदनामी करताहेत. महत्वाची बाब म्हणजे मला या सिरीयलच आतापर्यंत एकही दिवसाचे पेमेंट झालेले नाहीय

मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8- 8 / 10-10 तास करतात तेव्हा आमच्या घरात चूल पेटते. असं असताना मला एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केलं जातं आहे, असा दावा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने केला आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker