Marathi

प्राजक्ता माळीच्या घरी चिमुकल्या पाहुनीच आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली फॅन्सना हि गुड न्यूज !

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्या वेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने एका चिमुकल्या गोंडस बाळासोबत तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि माझे सोशल मीडियावरील अटेन्शन खाऊन टाकायला ही आली आहे असे कॅप्शन लिहिले आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत क्यूट फ्रॉक आणि टोपरे घातलेली एक गोंडस मुलगी प्राजक्ताच्या मांडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत प्राजक्ताने लिहिले आहे की, चला… आता माझं social media attention खाऊन टाकायला (‘गोबरे गाल’परंपरा जपणारी) माझी दुसरी भाचीही सज्ज झाली. जे मला फारच आवडणारे आहे. शिवप्रिया ही माझी भाची आहे (हो हो, काही कारणांमुळे नाव शिवप्रिया ठेवलं) त्यामुळे आता ‘हंसिनी, हंसा, रूद्राणी, सुभद्रा’ही नावं तुम्ही घेऊ शकता.

प्राजक्ताची ही भाची काहीच तासांत सोशल मीडियावर फेमस झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण केवळ एका दिवसांत प्राजक्ता आणि तिच्या या गोंडस भाचीच्या फोटोला तब्बल एक लाख २५ हजार लाईक्स मिळाले आहेत. आत्या आणि तिची भाची दोघीही खूपच छान दिसतात असे प्राजक्ताचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker