रिंकू राजगुरू या कारणामुळे अडकली लंडनमध्ये ! रिंकूच्या कुटुंबीयांनी केला मोठा खुलासा !

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये को’रो’ना व्हा’य’रस चा एक नवीन प्रकार आढळून आलेला आहे. या नवीन प्रकाराचा प्रसार खूप जास्त जलद गतीने होत आहे. त्यामुळे तेथील सरकारने लॉ’क’डा’ऊन जाहीर केले आहे. बॉलिवूडमधील आणि खूप सारे मराठी इंडस्ट्रीतील कलाकार देखील ब्रिटनमध्ये लॉ’क’डा’ऊनअसल्यामुळे अडकलेले आहेत.
त्यामुळेच सैराट मुळे प्रसिद्ध झालेली मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही देखील लंडनमध्ये अडकलेली असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये व वृत्तवाहिन्यांवर देण्यात आलेले होते. एका आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रिंकू लंडनला गेली असून लॉ’क’डा’ऊन मुळे तिथे अडकल्याचे म्हटले जात होते.
छूमंतर या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात रिंकू सध्या व्यस्त आहे. समीर जोशी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. प्रार्थना बेहेरे, सुरत जोशी, ऋषी सक्सेना आणि बाल कलाकार श्रीनिवास पोकळे हे देखील रिंकू सोबत या चित्रपटात आहेत. लंडनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलेले आहे. रिंकू राजगुरुने रसिकांच्या मनात सैराट चित्रपटानंतर आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तिने सैराट या सिनेमात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर तिने कधीही परत मागे वळून पाहिलं नाही. सैराट या चित्रपटामुळे रिंकू एका रात्रीतच महाराष्ट्र फेमस झाली होती. सोशल मीडियावरी रिंकू खूप सक्रिय असून ती चाहत्यांची संवाद साधत असते. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचे फॅन फॉलोविंग देखील चांगलेच वाढले आहे. तिने एवढ्यातच हंड्रेड या हिंदी वेब सिरीज मध्ये काम केले आहे
रिंकूच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे की, काही प्रसारमाध्यमांमध्ये व वृत्तवाहिन्यांवर ब्रिटन वरून येणाऱ्या विमानांना बंदी असल्यामुळे रिंकू लंडनला अडकलेली आहे असे वृत्त प्रसारित झालेले आम्ही पाहिले आहे. परंतु हे वृत्त खोटे आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रिंकू काही महिन्यांपूर्वी लंडनला गेलेली होती. मात्र, सध्या ती पुण्यात असून काही महिन्यांपूर्वी ती लंडनहून परतलेली आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.