Marathi

ऋषी कपूर च्या छोट्याशा चुकीमुळे मिथुन बनले सुपरस्टार ! जाणून घ्या रोमांचक गोष्ट….

अनेक वेळा आपल्या कुठल्यातरी लहान चुकीची आपल्याला मोठी शिक्षा मिळत असते. असंच काहीतरी ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार ऋषी कपूर यांच्या कडून देखील घडलं होतं. त्यांनी नाकारलेला एका साधारण चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती आज एक मोठा सुपरस्टार असल्याचे सांगितले जाते. केसी बोकाडिया हे ऐंशीच्या दशकातील एक सुप्रसिद्ध प्रोड्यूसर म्हणून ओळखले जातात. त्यांना त्याकाळी एक रोमँटिक चित्रपट तयार करायचा होता. त्यासाठी “प्यार झुकता नही” या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊ ऋषी कपूर यांच्याकडे गेले चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर ऋषी कपूर यांनी मी हा चित्रपट करू शकत नाही असं बोकाडिया यांना कळवलं आणि “जमाने को दिखाना है” या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर केसी बोकाडिया यांनी तीच स्क्रिप्ट मिथुन चक्रवर्ती यांना ऐकवली आणि मिथुन चक्रवर्ती यांना घेऊन त्यांनी चित्रपट देखील पूर्ण केला.

मित्रांनो “प्यार झुकता नही” या चित्रपटाला त्या वर्षीचे सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त झाले होते. त्या वर्षीचा सर्वात जास्त हिट चित्रपट म्हणून देखील या चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती ला एक नवीन ओळख मिळण्यास मदत झाली. त्या चित्रपटाने फिल्म फेअर सोबतच अनेक नामांकित पुरस्कार जिंकले. त्यानंतर ऋषी कपूर यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी केसी बोकाडिया यांच्यासोबत काम करण्याची इच्छा दाखवली. बोकाडिया यांनीदेखील कुठलाही द्वेष मनात न बाळगता ऋषी कपूर सोबत काम करण्यास होकार दिला. त्यानंतर या दोघांनी मिळून “नसीब अपना अपना” या चित्रपटाची निर्मिती केली चित्रपट देखील सुपरहिट होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker