News

अभिनेता ऋषी कपूर यांच्या प्रवासातील तुम्हाला माहीत नसलेले 5 रंजक किस्से.नक्की वाचा भावपूर्ण श्रद्धांजली

Rishi Kapoor Bollywood Movie Free Download | Rishi Kapoor Death

अभिनेता ऋषी कपूर यांचे आज दि. ३० एप्रिल २०२० रोजी कॅन्सरसोबत सतत दोन वर्ष झुंजताना निधन झाले आहे. त्यांच्या ६७ वर्षांच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देऊया… ऋषी कपूर यांचे चित्रपट जसे की बॉबी, चांदनी, नगिना, प्रेमरोग, लैला-मजनू, रफूचक्कर, बोल राधा बोल या चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. ऋषी कपूर यांनी त्यांचे वडील राज कपूर दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट हिट झाल्यामुळे चित्रपटसृष्टीला कपूर परिवारातून आणखी एक हिरा मिळाला.

१९७३ ला प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत स्क्रिन शेयर करताना त्यांनी एका १८ वर्षांच्या ‘राजा’ या मुलाची भूमिका उत्तमरित्या वठवली.

१९८० मध्ये ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नितू सिंग यांच्यासोबत विवाह केला. त्या दोघांनी मिळून १२ पेक्षा जास्त चित्रपटांत एकत्र काम केले. त्यातील उल्लेखनीय चित्रपट म्हणजेच ‘खेल खेल में’ (१९७५), ‘अमर अकबर एंथोनी’ (१९७७), ‘धन दौलत’ (१९८०). महत्वाचं म्हणजे २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेशरम’ या चित्रपटात ऋषी कपूर, पत्नी नितू सिंग व पुत्र-रत्न रणबीर कपूर या तिघांनीही एकत्र काम केले होते.

ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या त्यांच्या आत्मचरित्रात अनेक गोष्टींबाबत उघडपणे मतप्रदर्शन केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की ‘बॉबी’ च्या प्रदर्शनानंतर त्यांनी ३०,००० रुपये देऊन ‘बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’ खरेदी केला होता.

अभिनयासोबतच ऋषी कपूर ट्विटर या सोशल मिडीया साइटवरही बरेच अॅक्टिव्ह होते. चाहत्यांसोबत त्यांची जुगलबंदी असो की ट्रोलर्सना त्यांनी दिलेलं सडेतोड उत्तर असो, ऋषी कपूर कधीच मागे हटले नाहीत. कदाचित ‘जशास तसे’ हा त्यांचा बाणा असावा. एकदा एका तरुणीने ट्विटरवर त्यांच्याशी संवाद साधताना म्हटले की मी रणबीर कपूरची खूप मोठी फॅन आहे! तुम्ही हे त्याला सांगाल का? हजरजबाबी ऋषीजींनी लगेच उत्तर दिले, ” मी रणबीर कपूरचा पर्सनल असिस्टंट नाही!”

२०१७ मध्ये विनोद खन्ना यांचे निधन झाल्यावर बॉलिवुडच्या नव्या तारे-तारकांनी अंत्यसंस्काराला येण्याची तसदी घेतली नाही म्हणून ऋषी कपूर यांनी त्यांना चांगलेच खडसावले होते.  आज लॉकडाऊनमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना, मित्रांना व सहका-यांना त्यांचे अंतिम दर्शनही लांबूनच घ्यावे लागेल! असा हा चित्रपटसृष्टीचा लखलखता तारा चित्रपटसृष्टीत एक न भरणारी पोकळी निर्माण करुन आज अनंतात विलीन झाला !!

© Nikita Patharkar

जेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल

ऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश

Hindi Web Series Free Download

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker