ऋषी कपूर यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडू झाले होते खुश

ऋषी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायचे. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते मुक्तपणे व्यक्त व्हायचे. एकदा त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या बाजूने ट्विट केले होते. हे ट्विट पाहून पाकिस्तानी खेळाडूंनी आनंद व्यक्त केला होता.
काय म्हणाले होते ऋषी कपूर?
“IPLमुळे आपल्याला अनेक चांगले खेळाडू मिळाले. अफगाणिस्तान सारखा संघ देखील IPLचीच देण आहे. त्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना देखील खेळण्याची संधी द्यावी. मग होईल खरा सामना. आपलं हृदय खूप मोठं आहे.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.
IPL. You got world players. Afghanistan makes debut. My plea is please consider Pakistani players.Phir match hoga! Hum bade log hain.Please!
— Rishi Kapoor (@chintskap) April 4, 2017
Rishi Kapoor! why Pakistani cricketers are not a part of (IPL) when their commentators and coaches are #Cricket pic.twitter.com/LEywbJcNVp
— #CrickeTweets!🏏 (@asadjaved609) April 18, 2016
ट्विट त्यांनी दोन वर्षांपूर्वी केलं होतं. हे ट्विट त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होतं. पाकिस्तानी खेळाडूंनी तर त्यांचे आभार मानले होते. कारण ऋषी कपूर भारतातील पहिले सेलिब्रिटी होते ज्यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक्त केलं होतं. यापूर्वी देखील त्यांनी असंच एक ट्विट केलं होतं. “जर पाकिस्तानी सिनेकलाकार, क्रिकेटमधील पंच आणि समालोचन करणाऱ्या लोकांना भारतात येउन काम करण्याची संधी मिळते तर पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंचा देखील विचार करावा.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
One Comment