Marathi

भर पावसात रूपाली भोसलेच्या कुटुंबाला बाहेर काढले, किस्सा जाणून डोळे भरुन आल्याशिवाय राहणार नाही….

मराठी बिग बाॅसच्या पहिल्याच पर्वात अल्पावधीतच कार्यक्रमात रंजक बनवण्याचा मान पटकविणारी रूपाली. या शो मुळे आजवर खुप चर्चेत आहे. मास्टर शेफ पराग सोबतच्या मैत्री आणि प्रेमाचे काही वेगळेच किस्से आजही चर्चेत राहिले आहेत. परंतु शोच्या शेवटी तिने योग्य उत्तरही टोमणे देणाय्रांना दिलंय म्हणायला हरकत नाही. असो बिग बाॅस नंतर सतत limelight मध्ये असलेल्या रूपाली बद्दल फार कमी चाहत्यांना तिच्या विषयी माहिती आहे. म्हणून आज रूपाली भोसलेच्या जिद्दीच्या कहाणीवर आपण प्रकाश टाकणार आहोत.

रूपाली भोसले हिचा जन्म मुंबई येथील वरळी या शहरात एका सामान्य गरिब कुटुंबात झाला. गरिबी असली तरी आनंदी जिवन जगणाय्रा या कुटुंबात अचानक सख्ख्या काकांच्या एका चुकीमुळे वाईट दिवस येणे सुरू झाले. घर मिळवून देणाय्रा एका बोगस योजने मध्ये पैसे गुंतवले तिथे त्यांची फसवणूक झाली, त्यासोबत अटकही झाली.

Sooryavanshi Bollywood Movie 2020

म्हणून रूपालीच्या आई वडिलांना मुंबईतील राहती खोली विकावी लागली, त्यामुळे ते रस्त्यावर आले. भर पावसात एका ताडपत्री खाली रूपाली आणि रूपालीच्या भावंडांनी घालवली. कित्येक अनेक आप्तेस्ठांनी भर पावसात घरातून हाकलवल. पण रूपालीच्या वडिलांच्या एका मित्राला त्यांचे हाल बघविनाशे झाले.

एक परप्रांतीय बिहारी मित्राने त्याना घरी नेवून खावू पिवू घातले आणि त्याच्या ओळखीने एका पत्र्याच्या घरात राहायला आसरा करून दिला. संपूर्ण घर पत्र्याच असल्याने पत्र्याला होल पडली होती. म्हणून रूपालीला पहाटे तिन वाजता उठून आंघोळ करावी लागत असे. अनेकदा तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला पण लहान भावंडांना बघून हिम्मत झाली. नववीत असताना तिला शाळेला राम राम ठोकला. ती पुढे शिकलीच नाही.

अनेक ठिकाणी मिळेल ते काम केली. रिसेप्शनिस्ट म्हणून तर कधी काॅल सेंटर मध्ये तर कधी कोंबडी वड्याच्या गाड्यावर चपात्या लाटून तिने घर सांभाळले. हे सगळं करत असताना तिने नाटकात काम करणे चालू ठेवले. एवढ्या परिश्रमाच तिला एके दिवस फळ म्हणून ‘दोन किनारी दोघी आपण’ ही मालिका पदरात पडली. त्यानंतर तिला आजवर मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. अनेक हिंदी मराठी मालिकांसोबत कैक शोजमध्ये देखील ती झळकली आहे. शून्यातून झेप घेणाय्रा या हरहुन्नरी अभिनेत्रीला लाख सलाम.

Love Aaj Kal Bollywood Movie 2020

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker