Marathi

सलमान खान सोबत काम केलेल्या या अभिनेत्रीचे आले इतके वाईट दिवस, चाली मध्ये राहून जीवन जगत आहे!

1995 मध्ये ‘वीरगती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सलमान खान आणि अभिनेत्री पूजा डडवाल हे दोघे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या माध्यमातून पूजाने बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. 2004 मध्ये ‘हिंदुस्तान’ चित्रपटात ती शेवटच्या वेळी दिसली होती. बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीमधून गायब असलेली पूजा पुन्हा चर्चेत आली आहे. आणि सलमान खानकडे मदतीची विनंती करत आहे.

पूजाने ‘वीरगती’ नंतर अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. पण त्यानंतर तिला टीबी झाला. आणि तब्येत बिघडल्याने तिने चित्रपटांमध्येही काम करणे बंद केले.

तिच्याकडे उपचारासाठी पैसेही शिल्लक राहिले नाहीत. आणि घरच्यांनीही त्याला सोडलं. पूजाच्या आजाराची बातमी मीडियामध्ये आली आणि सलमानपर्यंतही पोहोचली. सलमान त्वरित सक्रिय झाला.

तो म्हणाला-

हे खूप वाईट आहे. मला याबद्दल माहिती नव्हती. पण आमची टीम त्यांना भेटेल. त्या लवकरात लवकर ठीक होतील.

पाच महिन्यांच्या उपचारानंतर पूजाला रुग्णालयातून सोडण्यात आले. आता ती आजारातून मुक्त झाली आहे आणि मुंबईच्या वर्सोवा येथे राहते. येथील चाळीत राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या घरात तिला राहण्यासाठी जागा दिली आहे. त्या बदल्यात ती घरकाम करते. चटई वर झोपते.

एका न्यूज वेबसाईटशी बोलताना पूजा म्हणाली –

मी घरचे जेवण बनवते. मी माझे कपडे स्वतः धुते. सलमान हे पहात असेल तर त्यांनी मला मदत करावी लागेल. जेणेकरून मी पुन्हा माझ्या पायावर उभे राहू शकेन.

पूजा सांगते की सलमानच्या टीमने तिच्या उपचाराचा खर्च उचलला आणि तिची काळजी घेतली. तिचे म्हणणे आहे की सलमानने तिला फक्त औषधेच दिली नाहीत तर कपडे, खाण्यापिण्याचे पदार्थ, साबण आणि डायपर साठीचे पैसे देखील दिले.

आज ती फक्त सलमान खानमुळे जिवंत आहे. तिला त्याचे आभार मानायचे आहे. आणि सलमानने तिला स्वावलंबी होण्यास मदत करावी अशी तिची इच्छा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker