Marathi

बजरंगी भाईजान मधील मुन्नी आता खूपच बदलली आहे, फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…

सलमान खानची ब्लॉकबस्टर फिल्म ‘बजरंगी भाईजान’ ने प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. हा चित्रपट लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा राहिला आहे. चित्रपट आजहि जेव्हा टेलिव्हिजनवर येतो तेव्हा त्याला पाहिल्याशिवाय कुणी राहत नाही. चित्रपटात सलमान खान हा आकर्षणाचे केंद्र होताच पण, सलमानच्या शिवाय चित्रपटात आणखी एक पात्र होत ज्यामुळे चित्रपट हिट झाला होता. ते पात्र होत ‘मुन्नी’, अर्थातच बाल कलाकार हर्षाली मल्होत्रा ​​हीच.

हर्षाली मल्होत्राचे पात्र चित्रपटामध्ये सर्वानाच आवडले. हर्षाली ने चित्रपटात एकाही डायलॉग बोलला नाही. परंतु तिची मसुमियत, हास्य आणि ना बोलता केलेला अभिनय प्रेक्षकांना खूपच जास्त आवडला. फिल्मला रिलीज होऊन 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता तर हर्षाली खूप मोठी झाली आहे. आम्ही तुम्हाला हर्षालीबद्दल कुणालाही माहित नसलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत.

हर्षालीचा जन्म 3 जून 2008 रोजी झाला. तिच्या आईचे नाव काजल मल्होत्रा ​​आहे. हर्षाली मुंबईच्या वन स्क्वायर एकेडमीची विद्यार्थिनी आहे. असं असलं तरी हर्षाली मूळची दिल्लीची आहे पण तिचे आई-वडिल तिच्या बॉलीवूडमधील डेब्यू नंतर मुंबईत शिफ्टझाले आहेत. हर्षाली ने फक्त  21 महिन्यांत कॅमेरा फेस केला. बजरंगी भाईजानच्या आधी हर्षालीचे अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले होते.

हर्षालीने टेलिव्हिजन वर ‘कुबूलहै’ आणि ‘लौट आओ तृषा’ या मालिकांमध्ये काम केलेले आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक जाहिरातींमध्ये तिने काम केलेले आहे. तिने सलमानच्या बजरंगी भाईजान चित्रपटाच्या आधी सलमानची फिल्म ‘प्रेम रतन धन पायो’ साइन केली होती. पण बजरंगी भाईजान मध्ये हर्षलीचा अभिनय मोठा होता म्हणून तिने प्रेम रतन धन पायो चित्रपट सोडला होता.

हर्षाली बद्दल सांगितले कि जरी ती सलमानच्या चित्रपटात ती खूप क्युट आहे पणखऱ्या आयुष्यात ती खूप जास्त भावनिक आहे. हर्षाली ने जेव्हा बजरंगी भाईजान मध्ये काम केले तेव्हा ती फक्त 7 वर्षांची होती. चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी जेव्हा सलमान रडत असेल किंवा सलमानचा फायटिंग सीन देत असेल तर त्याही वेळी ती रडायला लागायची. त्यानंतर सलमान स्वत: तिला शांत करत असे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker