Marathi

‘वीरगती’ या चित्रपटातील अभिनेत्री २५ वर्षांनंतर पुन्हा करणार बॉलीवूड मध्ये पदार्पण, सलमान खान…

बॉलिवूड मध्ये अनेक वेळा खूप कालांतराने काही कलाकार या रुपेरी पडद्यावर ती पुनरागमन करत असतात. सलमान खान सोबत वीरगती मध्ये काम केलेली कलाकार पूजा डडवाल देखील सिनेसृष्टीत परत काम करणार आहे. तिने नुकतेच शुक्राना या शॉर्ट फिल्म द्वारे पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे. 5 फेब्रुवारी रोजी पूजाने यासंबंधी फोटोशूट देखील केलेलं आहे. या फिल्म चे दिग्दर्शक आणि लेखक सुरेंद्रसिंह हे करत आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये एका सामान्य महिलेची कहानी दाखवण्यात येणार आहे. घरेलू हिंसेमुळे एखाद्या गृहिणीच्या जीवनामध्ये किती अडचणी निर्माण होतात आणि त्यातून एक गृहिणी कसा मार्ग काढत राहते याबद्दल ही शॉर्ट फिल्म आहे असे सांगितले जात आहे.

आपल्या पुनरागमन याबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, ” शुक्राना” चे दिग्दर्शक सुरेंद्र सिंग त्यांनी यु ट्यूब वरती माझा एक व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी त्या व्हिडिओ तील माझं काम बघून मला या कामासाठी विचारणा केली. निर्माता विकास जोडी यांच्याशी झालेल्या मुलाखत त्यानंतरच मी प्रोजेक्टसाठी होकार भरला.”

पूजा डडवाल यांना आता बॉलीवुड साठी अजून काहीतरी काम करण्याची इच्छा आहे. अभिनय ही त्यांची पहिली आवड असून त्या अजूनही त्यांना अभिनयाची प्रचंड आवड आहे. त्यांना अनेक प्रकारच्या भूमिका साकारायचा आहेत. विशेष करून त्यांना एक निगेटिव्ह भूमिका देखील साकारायची प्रचंड इच्छा आहे. शुक्राना बद्दल बोलताना प्रोड्युसर विकास जोली म्हणाले की, ” शुक्राना म्हणजे आपण ईश्वराला धन्यवाद करत आहोत असा त्याचा अर्थ होतो.

जेव्हा माझ्याकडे हा विषय आला तेव्हाच मी या विषयावरती काम करण्यासाठी तयार होतो आणि अशा चांगल्या विषयावर ते काम करण्यासाठी मी नेहमीच तयार असतो.” या शॉर्ट फिल्म शूटिंग 21 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू करण्यात येईल. पूजा आणि शॉर्ट फिल्म सर्व टीम अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात आशीर्वाद घेतल्यानंतर आपले काम चालू करेल असे सांगण्यात येत आहे.

2020 Bollywood Movies

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker