Marathi

या कारणामुळे अक्षय कुमार शाहरुख खानसोबत कधीही काम करत नाही, ऐकून थक्क व्हाल!

अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे दोघेही बॉलीवूड मधील दिग्गज कलाकार आहेत. दोन्हीही कलाकार आपले चित्रपट व अभिनय यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत ज्यात अनेक दिग्गज कलाकार सोबत काम करताना दिसतात. या कलाकारांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केलेले आहे.

बॉलिवूडमध्ये असेही अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधीही एकत्र काम केलेले नाही किंवा फारच कमी कमी वेळा सोबत काम केलेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉलीवूडचे दोन दिग्गज शाहरुख खान आणि अक्षय कुमार. चित्रपटात मुख्य भूमिका म्हणून शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी कधीही एकत्र काम केलेले नाही. यामागे बरेच त’र्क-वि’त’र्क लावले जातात पण खरे कारण हे वेगळेच आहे.

अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांनी कधीही कोणत्याही चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून एकत्र काम केलेले नाही. परंतु, या दोन्ही कलाकारांनी एकमेकांच्या चित्रपटांमध्ये नक्कीच छोट्याश्या भूमिका केलेल्या आहेत आहेत. शाहरुख खानच्या दिल तो पागल है या चित्रपटात अक्षय कुमारने पहिल्यांदा कॅमिओ रोल केलेला होता. त्याचवेळी शाहरुख खानने अक्षय कुमारच्या ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या गाण्यासाठी कॅमिओ रोल केलेला होता.

आता शाहरुख खानने एकमेकांशी काम न करण्याबद्दल मोठे व’क्त’व्य केलेले आहे. शाहरुख खानने अलीकडेच माध्यमांना आपली एक मुलाखत दिली. यावेळी, बॉलिवूडच्या किंग खानने अक्षय कुमारसोबत काम न करण्याबद्दल सर्वाना चकित करणारे भा’ष्य व्य’क्त केले आहे. त्यामुळे या दोघांनी आत्तापर्यंत कधीही मुख्य अभिनेता म्हणून सोबत काम न करण्याचे कारण सांगितले आहे.

शाहरुख खानने अक्षय कुमारसोबत काम न करण्याबद्दल एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला, ‘मी याबद्दल काय बोलू? मी अक्षयसारखा सकाळी लवकर उठत नाही. जेव्हा तो सकाळी उठतो, तेव्हा मी झोपायला जातो. त्याचा दिवस माझ्यापेक्षा खूप लवकर सुरू होतो. मी जेव्हा काम सुरू करतो तेव्हा ते पॅ’क’अ’प करुन घरी जात असतो. मी रात्रभर जगणारा माणूस आहे. माझ्याप्रमाणेच इतर लोकांना रात्री काम करण्याची सवय नाही.

शाहरुख खान पुढे म्हणाला की, जर तो आणि अक्षय कुमार एकत्र चित्रपटात काम करत असतील तर ते सेटवर एकमेकांना कधीच भेटू शकणार नाहीत. शाहरुख खान म्हणाला, ‘दोघेही सेटवरच भेटणार नाहीत. तो निघून जाईल आणि मी नंतर येईल. मला अक्षयसोबत काम करायचं आहे पण आमचा वेळ कधीही जु’ळ’णा’र नाही.’ शाहरुख खानच्या या व’क्त’व्या’ची बरीच चर्चा होत आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker