ह्या पाच चुकांमुळे तुमचा मोबाईल होतो स्लो चार्ज, यामुळे टीमचा मोबाईल खराबही होऊ शकतो !

अँड्रॉइड स्मार्टफोनच्या आगमनापूर्वी मोबाईल फोन फक्त कॉल करणे किंवा मेसेजिंगपुरते मर्यादित होते. परंतु आता लोकांनी स्मार्टफोन अधिक वापरण्यास सुरुवात केली आहे. आजकाल नवीन तंत्रज्ञानासह स्मार्टफोन बाजारात आले आहेत, जे वेगवान चार्जिंगसह सुसज्ज आहेत. परंतु बर्याचदा लोक आपल्या स्मार्टफोनच्या स्लो चार्जिंगमुळे परेशान असतात. स्मार्टफोन स्लो चार्जिंग होण्यामागे पुष्कळ कारणे आहेत, ज्यावर त्वरीत लक्ष जात नाही. तर तुमच्या स्मार्टफोनही स्लो चार्जिंग होत असेल तर, आम्ही येथे तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या स्मार्टफोन फास्ट चार्ज करू शकता.
1. नेहमी ओरिजिनल चार्जर वापरा.
स्मार्टफोन चार्ज करताना नेहमीच ओरिजिनल चार्जर वापरा. बाजारात मिळणारे बनावट आणि स्वस्त चार्जर वापरू नका. असे केल्याने स्मार्टफोन फुटण्याची शक्यताही जास्त आहे आणि स्मार्टफोन खराब होण्याचा धोका आहे.
२. मागील कव्हर काढून चार्ज करा.
आपण सर्वजण आपला स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी फोनवर बॅक-कव्हर ठेवतो. परंतु कदाचित आपणास हे माहित नाही की फोनला बॅक-कव्हरसह चार्ज केल्याने मोबाईलची हिट = बाहेर पडत नाही, कव्हर वापरुन हिट ट्रैप झाल्यामुळे फोन गरम होतो. यामुळे बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. आपण कव्हर काढल्यास उष्णता बाहेर जाईल आणि फोन फास्ट चार्ज होईल.
3. डुप्लिकेट डेटा केबल वापरू नका.
असे दिसून कि डेटा केबल लवकर खराब होते आणि लोक स्वस्त आणि बनावट डेटा केबल वापरतात, तर चार्जर ओरिजिनल असते. मित्रांनो, बनावट डेटा केबलचा वापर केल्याने केवळ फोन स्लो चार्ज होणार नाही तर यामुळे आपल्या फोनचे नुकसानही होऊ शकते.
४. ह्या मोड्सचा वापर करा.
नेहमी पॉवर सेव्हिंग मोड / बॅटरी सेव्हर वापरुन स्मार्टफोन चार्ज करा. असे केल्याने स्मार्टफोनचे एक्स्ट्रा बैकग्राउंड एप्स बंद होतात आणि स्मार्टफोन लवकरच चार्ज होईल.
५. फोन बंद करूनच चार्ज करा.
आपण नेहमी फोन स्विच ऑफ करुनच चार्ज पाहिजे, असे केल्याने स्मार्टफोन फास्ट चार्ज होईल कारण नेटवर्क सिग्नल बंद होतील आणि बर्याच अॅप्स देखील बंद केल्या जातील, त्यामुळे फोनची बॅटरी फास्ट चार्ज केली जाईल.