Marathi

तुम्हाला ही घोरण्याचा त्रास आहे का? करा हे सोपे उपाय…

घोरणे म्हणजे सुखी माणसाचे लक्षण असा एक गोड गैरसमज आपल्यामध्ये पाहायला मिळतो. पण ह्या झोपेत घोरण्याच्या समस्येने बरेच लोक आणि त्यांचे जिवलग त्रस्त असतात.

बंद नाक, वाढलेले वजन, श्वसन-नलिकेत समस्या ह्यांमुळे झोपेत श्वासोच्छ्वासास समस्या निर्माण होतात. ह्यातून घोरणे निर्माण होते. ह्यावर कितीही उपाय केले तरी त्याचा फायदा होत नाही. पण आता काळजी नाही हे सोपे उपाय ह्यापासून तुमची सुटका करतील.

  • वजन कमी करणे

वाढलेले वजन हे घोरण्यामागचे सामान्य कारण आहे. ह्यामुळे घशात अतिरिक्त मेदयुक्त पेशी तयार होतात. ह्यावर सोपा उपाय म्हणजे वजन कमी करणे.

  • झोपण्याची पद्धत बदला

घोरण्याची समस्या असलेल्या लोकांनी पाठीवर झोपणे टाळावे. त्याऐवजी त्यांनी कुशीवर झोपण्यास प्राधान्य द्यावे. कुशीवर झोपणे शक्य नसेल तर पाठीवर झोपणाऱ्यांनी डोके कमीत कमी 2 इंच वर करून झोपावे. ह्यामुळे हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही.

  • नाक मोकळे ठेवा

बंद नाक हे घोरण्यासाठी कारणीभूत ठरते. ह्यामुळे हवा शरीरात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो परिणामी तोंडाने श्वास घ्यावा लागतो आणि घोरण्याची समस्या निर्माण होते. बंद नाक मोकळे करणे ह्या त्यावर रामबाण उपाय आहे.

  • मद्यपान टाळा

झोपण्याआधी मद्यपान टाळावे. ह्यामुळे घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

  • व्यायाम

कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल पण जीभ आणि घशाच्या स्नायूंचे व्यायाम ह्यापासून आराम देण्यास मदत करतात.

  • आहार

शरीराशी निगडीत प्रत्येक समस्येसाठी बहुतांश वेळा आहार गुणकारी ठरतो. इंफ्लामेट्री अन्न मेदयुक्त पेशींच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे इंफ्लामेट्री अन्नाचे सेवन कमी करणे घोरण्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी गुणकारी ठरते.

मध सर्दीमुळे निर्माण होणाऱ्या घोरण्याच्या समस्येपासून सुटका देते.

पुदिना नाक आणि घशामधील सूज आणि वाढलेल्या पेशी कमी करण्यास मदत करते.

लसूण, हळदीचे दूध ह्यांमध्ये अँटीइंफ्लामेट्री गुण असतात. ह्यांचे नियमित सेवन घोरणे कमी करण्यास मदत करते.

कांदा हा नाक आणि घसा साफ करण्यास मदत करतो. त्यामुळे घोरणे कमी होते.

भरपूर पाणी प्या. पाणी शरीरातील पेशींना सतत कार्यरत ठेवण्यास मदत करते.

वरील उपाय हे सर्वांसाठी फायदेशीर ठरतीलच असे नाही. काही लोकांना वरील गोष्टींमुळे ऍलर्जीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच वरील उपाय करा.

तुम्हाला हा लेख कसा वाटला आणि अजून कुठल्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker